नाशिक : भाजप नेत्या पंकजा मुंडे (BJP leader Pankja Munde) सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. मात्र त्यांचा हा दौरा वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. काल सकाळी त्यांनी ज्येष्ठ तसेच मार्गदर्शक म्हणून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे तोंड भरून कौतुक केले. त्यानंतर काही वेळाने त्या भुजबळांचे कट्टर विरोधक शिवसेनेचे आमदार सुहार कांदे (MLA Suhas Kande)यांच्या निवासस्थानी पोहचल्या. त्यामुळे त्यांनी आमदार कांदेंशी काय गप्पा मारल्या असतील हा चर्चेचा विषय ठरला आहे.
श्रीमती मुंडे कालपासून शहराच्या दौऱ्यावर आहेत. दिवाळीच्या पूर्वसंध्येला सुरु झालेल्या या दौऱ्यात त्यांनी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. प्रदिर्घ कालावधीनंतर त्या दौऱ्यावर आल्याने विविध कार्यकर्ते, समर्थक, सामाजिक व राजकीय कार्यर्त्यांनी त्यांची भेट घेतली. सकाळी आमदार देवयानी फरांदे यांच्या पुढाकाराने झालेल्या संदर्भ सेवा रुग्णालयाच्या इमारतीच्या भुमीपूजनाच्या कार्यक्रमात हे दोन्ही नेते उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी भुजबळांचे कौतुक केले. (कै) गोपीनाथ मुंडे यांचे सहकारी व ओबीसी नेते म्हणून विविध संदर्भांना त्यांनी उजाळा दिला. श्री. भुजबळ यांनी देखील मुंडे यांचा सन्मान केला. त्यामुळे या राजकीय देहबोली व संवादाची चर्चा तर होणारच होती, तशी ती झाली.
सकाळच्या या कार्यक्रमांनतर दुपारी श्रीमती मुंडे यांनी भुजबळांचे कट्टर राजकीय विरोधक, शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांनी आमदार कांदे तसेच कुटुंबियांशी गप्पा देखील मारल्या. त्याचे छायाचित्र त्यांनी फेसबुकवर शेअर केले. त्यांच्या दौऱ्यात त्यांनी अनेक पदाधिकारी, नेत्यांच्या घरी भेट दिली. त्यात ही भेट अधिक चर्चेत राहिली.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यातील वाद मुख्यमंत्र्यांपासून तर उच्च न्यायालयापर्यंत पोहोचल्याने राज्यभर चर्चेत आहे. त्यांच्यातून सध्या विस्तवही जात नाही. दोनच दिवसांपूर्वी आमदार कांदे यांनी आपल्या नांदगाव मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची पुन्हा एकदा तक्रार केली होती. यासंदर्भात त्यांनी डीपीडीसीच्या जुन्या कामांना निधी मंजूर वा वितरीत करू नये. नव्या कामांना मंजूरी द्यावी अशी मागणी केली होती. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्या डिप्लोमसीत नेमके काय दडले असावे?. भुजबळ आणि कांदे यांच्यातील मतभेदात त्या पुल म्हणून सुसंवाद तर घडवत नसाव्यात ना?.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.