Mehboob Shaikh, NCP.
Mehboob Shaikh, NCP. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भाजपचे धोरण संविधान, आरक्षणविरोधी!

Sampat Devgire

पारोळा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेले कार्य लोकांपर्यंत गेले पाहिजे. प्रत्येक बूथवर १० युथ अशी युवकांची फळी निर्माण करून पुढील २०२४ च्या निवडणुकीत वेगळा निकाल लागला पाहिजे, यासाठी युवकांनी गावागावांत व घराघरांत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार पोहोचवावेत, असे आवाहन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांनी केले.

येथील राष्ट्रवादी कार्यालयात शरद युवा संवाद यात्रेप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने देशातील लोकशाही, महिला व सामान्यांचे अधिकार, राज्यघटना या सगळ्यांची मोडतोड करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपला महाराष्ट्रात रोखले. त्यामुळे आज राज्यात जनतेचे व सामान्य जनतेच्या मनातील राज्य आहे. अन्यथा भाजपने केंद्रीय यंत्रणांच्या दजपशाहीने देशातील आघाडीचे राज्य रसातळाला नेले असते. त्यामुळे हे राज्य सरकार व राष्ट्रवादी पक्षाची उर्जा असलेल्या शरद पवार यांचे कार्य घरोघरी पोहोचवा. त्यातून नव्या पिढीला निश्चितच प्रेरणा मिळेल.

या वेळी श्री. शेख यांनी भाजपच्या ओबीसी आरक्षणविषयक धोरणाचा खरपूस समाचार घेतला. आरक्षणासाठीचा इम्पिरियल डाटा आमच्याजवळ आहे, असे संसदेत सांगणारे भाजपवाले सर्वोच्च न्यायालयात हा डाटा दोषयुक्त असल्याचे सांगतात. ही त्यांची दुटप्पी भूमिका संविधान व आरक्षण विरोधी असल्याचे सांगून, भाजपने सातत्याने ओबीसी नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न केला. एकनाथ खडसे यांना उमेदवारी नाकारून त्यांच्या मुलीला उमेदवारी दिली व तिला पराभूत करण्याचेही काम भाजपने केले. खडसे यांची पत्नी, मुलगी, जावई यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला.

निवडणुका तोंडावर आहेत. अशावेळी तरुणांनी भाजपची ही नीती लोकांपुढे मांडून राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांची ताकद सिद्ध करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी माजी खासदार ॲड. वसंतराव मोरे व डॉ. सतीश पाटील यांनी शरद पवार यांनी सर्वांसोबत घेऊन समाज व राजकारण केले असून, युवकांनी राष्ट्रवादीच्या प्रवाहात येण्याचे आवाहन केले. प्रदेशाध्यक्ष मेहबूब खान यांनी भाजपच्या धोरणांवरच तोफ डागली. तसेच राज्यातील सरकार सुरळीत सुरू असून, राज्याच्या योजना तळागाळात पोहोचविण्याचे आवाहन केले. संतोष महाजन यांनी सूत्रसंचालन केले. बाळू पाटील यांनी आभार मानले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT