Dr. Vijaykumar Gavit & Chandrakant Raghuwanshi
Dr. Vijaykumar Gavit & Chandrakant Raghuwanshi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भाजप आणि शिंदे गटापुढे दोन्ही काँग्रेसची धूळधाण !

Sampat Devgire

नंदुरबार : नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज मतमोजणीनंतर जाहीर झाला. त्यात ७५ गावांच्या लोकनियुक्त सरपंचांची निवड घोषित झाली आहे. या निकालात ७५ पैकी ४२ ग्रामपंचायतींवर आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित (भाजप) यांचा, तर २८ ग्रामपंचायतींवर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या (शिवसेना शिंदे गट) गटाने विजयाचा दावा केला आहे. यामध्ये शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसचा धुव्वा उडाला.(Shivsena & Both congress loose in Village Panchayat election)

एका ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी, तर चार ग्रामपंचायतींवर अपक्षांनी वर्चस्वाचा दावा केला आहे. सहा ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या.

सहा ग्रामपंचायतींपैकी भाजप व शिवसेना शिंदे गटाने प्रत्येकी तीन ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. त्यात सुतारे, पथराई व वरूळ ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या शिंदे गटाने, तर देवपूर, नटावद व भवानीपाडा ग्रामपंचायतीवर भाजपने यापूर्वीच दावा केला आहे. उर्वरित ६९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. ८२.०९ टक्के मतदान झाले होते. आज नंदुरबार येथील वखार महामंडळाच्या गुदामात मतमोजणी करण्यात आली. ६९ ग्रामपंचायतीपैकी ३९ भाजप, २५ शिवसेना (शिंदे गट), ४ अपक्ष, तर १ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी पक्षाने वर्चस्वाचा दावा केला आहे. नंदुरबार पंचायत समितीचे उपसभापती असलेले शिवसेनेचे कमलेश महाले यांचे गाव असलेले आष्टे गावात भाजपचा विजय झाला आहे. शिवसेनेला पराभवाला सामोरे जावे लागले.

भाजपने दावा केलेल्या ग्रामपंचायती

अंबापूर, आष्टे, बालअमराई, ढेकवद, धीरजगाव, नवागाव, जळखे, काळंबा, पातोंडा, नागसर, श्रीरामपूर, शिरवाडे, वडझाकण, भांगडा, गुजरभवाली, मंगरूळ, मालपूर, लोय, निंमगाव, कोठली, पावला, शिवपूर, वागशेपा, वसलाई, चाकळे, व्याहूर, इंद्रहट्टी, वासदरे, नळवे बु., नळवे खुर्दे, सुंदर्दे, उमर्दे बु., खोडसगाव, पळाशी, कोळदे, शिंदे, गंगापूर, फुलसरे, नारायणपूर.

शिवसेनेने (शिंदे गट) दावा केलेल्या ग्रामपंचायती अशा, अजेपूर, बिलाडी, हरिपूर, पाचोराबारी, खामगाव, टोकर तलाव, विरचक, वाघाळे, आर्डीतारा, धुळवद, निंबोणी, राजापूर, नंदपूर, वेळावद, भोणे, दुधाळे, दहिंदुले बु., दहिंदुले खु., पिंपरी, नांदर्खे, धमडाई, करजकुपे, लहान शहादा, होळतर्फे हवेली.

अपक्षांचा दावा

नंदुरबार तालुक्यातील रनाळे खुर्दे, शेजवा, उमज, ठाणेपाडा येथील ग्रामपंचायतींवर अपक्षांनी वर्चस्वाचा दावा केला आहे. तालुक्यातील वाघोदा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने दावा केला आहे.

गावितांच्या पुतणीचा पराभव

राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या पुतणी तथा नंदुरबार पंचायत समिती सभापती प्रकाश गावित यांच्या कन्या प्रतिभा वळवी या दुधाळे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदासाठी भाजपकडून उभ्या होत्या. त्यांचा शिवसेनेच्या अश्‍विनी माळचे यांनी ५४१ मतांनी पराभव केला.

नंदपूर येथे ईश्‍वरचिठ्ठी

तालुक्यातील नंदपूर ग्रामपंचायतीत भाजपच्या रोहिणी नाईक व शिंदे गटाच्या सुनीता नाईक या उमेदवारांना समान १३४ मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. मिकांक्षा राकेश शिंदे या बालिकेच्या हस्ते ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. त्यात शिंदे गटाच्या रोहिणी नाईक विजयी झाल्या.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT