seized Rice at Surgana of PDC Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Crime : महसूल विभागाची सुरगाण्यात मोठी कारवाई; धान्याच्या काळाबाजाराचे धक्कादायक गुजरात कनेक्शन उघड!

Black market of Maharashtra PDS Shop rice sold in expossed by Surgana Tahsildar team-आदिवासींसाठीचा तांदूळ रेशन दुकानातून जातो थेट गुजरातच्या काळ्या बाजारात, तहसीलदारांनी ९ लाखांचा तांदूळ पकडला

Sampat Devgire

Tribel corruptionNews: सार्वजनिक वितरण विभागाच्या धान्याचा काळाबाजर राजपोसपणे सुरू असतो. याबाबत अनेकदा कारवाई करूनही रेशन दुकानदारांवर त्याचा परिणाम होत नाही. आता यामध्ये गुजरात कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या जिल्ह्यातच धान्याचा काळाबाजार पुन्हा एकदा उघड झाला आहे. याबाबत तहसीलदारांनी सुरगाणा शहरात मोठी कारवाई करीत ट्रकसह तांदूळ जप्त केला आहे.

आदिवासी विभागाच्या विविध धान्याचा पुरवठा सीमेवरील सुरगाणा तालुक्याला होतो. येथून रेशन दुकानदारांच्या धान्यासह आदिवासी विकास महामंडळाच्या धान्याचाही गुजरातला काळ्या बाजारात विक्री केला जातो. यापूर्वीही स्टींग ऑपरेशन करून मोठी कारवाई झाली होती.

सुरगाणा येथे महसूल विभागाने सोमवारी धाड टाकली. काळ्या बाजारात विक्रीसाठी जाण्याच्या तयारीतील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील (PDS) शेकडो क्विंटल धान्य यावेळी जप्त केले. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. आदिवासी, गरिबांच्या तोंडातील घास काळ्या बाजारात पोचविणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला.

तहसीलदार रामजी राठोड आणि सुरगाणा पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. त्यात सुमारे ₹८.९४ लाखांचा माल जप्त करण्यात आला. हे धान्य जिवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत बेकायदेशीररीत्या साठवून ठेवण्यात आल्याचा प्राथमिक संशय आहे.

तहसीलदार राठोड यांना गोपनिय माहिती मिळाली होती. सुरगाणा–उंबरठाण रोडलगत मोतीबाग परिसरात एक आयशर ट्रक (एमएच. १५ जेसी ६०९६) उभा होता. त्यात मोठ्या प्रमाणावर धान्य साठवलेले होते. तहसीलदारांनी पुरवठा निरीक्षकांच्या माध्यमातून कारवाई केली.

श्री. नेरकर यांनी त्वरित तपास पथकाद्वारे कारवाई केली. त्यात बी. एस. बाघ (पुरवठा निरीक्षक), पंच यशवंत ब्रम्हे (३२), नितीन बाथमारे (३४), श्याम भंडारी (३८) आणि संतोष महाले (४२) यांचा समावेश होता. त्यांनी ट्रक क्रमांक एमएच १५ जेएच ५६३१ जप्त केली.

या घटनेनंतर तहसीलदार रामजी राठोड यांनी माहिती दिली. “सरकारच्या योजनांमधून गरीब जनतेसाठी दिले जाणारे रेशन धान्य कोणीही काळ्या बाजारात विकू शकत नाही. अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर आम्ही शून्य सहनशीलता ठेवणार आहोत. दोषींना कठोर शिक्षा होईल.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT