Teachers salary stopped in bogus Shalarth ID case Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bogus School ID Scam: बोगस शालार्थ 'आयडी'प्रकरणी शिक्षकांवर मोठी कारवाई; आता थेट 'SIT' कडून होणार चौकशी, पगारही रोखले!

Teachers salary stopped in bogus Shalarth ID case : बोगस शालार्थ आयडी प्रकरणी शिक्षकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. आता एसआयटीमार्फत चौकशी होणार असून संबंधित शिक्षकांचे पगारही रोखण्यात आले आहेत. जाणून घ्या सविस्तर माहिती.

Sampat Devgire

बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती आता आणखी वाढली आहे. पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) नियुक्त शिक्षकांची माहिती मागवली होती. मात्र, या मागणीला प्रतिसाद न देणाऱ्या शिक्षकांची आता थेट पोलीस चौकशी होणार आहे.

बोगस शालार्थ आयडी तयार करून शिक्षण संस्था चालक आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केलेला मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाने सत्ताधारी पक्षाशी संबंधित राजकीय नेते आणि शिक्षण अधिकाऱ्यांना अटक केली आहे.

शासनाचे सुमारे १५० कोटी रुपयांचे अनुदान भ्रष्ट मार्गाने हडप करण्याचा हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे शिक्षण संस्था चालकांबरोबरच संबंधित शिक्षकांचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे. एसआयटीने शिक्षण संस्था चालकांनी नियुक्त केलेल्या ६५० शिक्षकांची माहिती मागवली होती.

एसआयटीने मागवलेल्या ६५० शिक्षकांपैकी ५३० शिक्षकांनी आवश्यक माहिती सादर केली आहे. मात्र, उर्वरित शिक्षकांनी वैयक्तिक नियुक्ती आणि वेतनासंदर्भातील माहिती अद्याप पाठवलेली नाही.

दरम्यान, शिक्षण विभागाने या प्रकरणी अधिक कडक भूमिका घेतली आहे. माहिती सादर न करणाऱ्या संबंधित शिक्षकांचे नोव्हेंबर महिन्यापासून वेतन थांबवण्यात येणार आहे. आतापर्यंत ५३० शिक्षकांच्या नियुक्ती आणि इतर आवश्यक बाबींची माहिती संकलित करण्यात आली आहे.

एसआयटीच्या मागणीनंतरही माहिती सादर न करणाऱ्या शिक्षकांवर आता तपास पथकाचे लक्ष केंद्रित झाले आहे. या शिक्षकांची थेट पोलीस चौकशी केली जाणार असून, तपासाअंती त्यांच्या विरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे. सुमारे १५० शिक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता असल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT