Dr Zakir Shaikh at Panchale (Sinner) Farmers Home Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP Sharad Pawar Politics: बिबट्याचा हल्ला; उध्वस्त शेतकरी कुटुंबाला राष्ट्रवादीच्या नेत्यांचा असाही दिलासा!

Leopard Attack Devastates Farmer Family NCP Leaders Step In With Support: राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ झाकीर शेख पंचाळे (सिन्नर) येथील आपत्तीग्रस्त शेतकऱ्याच्या मदतीला धावले.

Sampat Devgire

Dr Zakir Sheikh News: ग्रामीण भागच नव्हे तर नाशिक शहरातही सध्या बिबट्यांचा उच्छाद सुरू आहे. बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वारंवार होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक कुटुंब संकटग्रस्त बनली आहेत.

पंचाळे (सिन्नर) गावात गेली काही दिवस बिबट्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. शेतकऱ्यांना त्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे. यामध्ये गणेश थोरात या अकरा वर्षाच्या मुलाला बिबट्याने हल्ला करून त्याचा फडशा पाडला.

या प्रसंगात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते डॉ झाकीर शेख यांनी मदतीसाठी पुढाकार घेऊन या कुटुंबाला आधार दिला. कुटुंबातील मुलगी तसेच महिलेला नवे कपडे आणि अर्थसाह्य देऊन धीर दिला. परिसरातील ग्रामस्थही या मदतीत त्यांच्यासोबत आले.

एकुलता मुलगा बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याने थोरात कुटुंब संकटग्रस्त बनले होते. यासंदर्भात वनविभागाने त्यांना आर्थिक मदत केली. मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावरच हा दुर्धर प्रसंग कोसळल्याने शेतकरी थोरात कुटुंबाची येणारी दिवाळी देखील दुःखात हरवली होती.

सध्या नाशिक शहर आणि ग्रामीण भागात बिबट्यांचा वावर प्रचंड वाढला आहे. या बिबट्यांना पिंजरे लावून पकडताना वनविभागाची ही दमछाक होत आहे. जनावरे आणि लहान मुले बिबट्याच्या या हल्ल्याला बळी पडले आहेत.

बिबट्याच्या हल्ल्याने होणाऱ्या या हानीला वाचवणे किंवा त्यापासून धीर देणे मोठे आव्हान आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ शेख यांनी घेतलेला पुढाकार चर्चेत आहे. डॉक्टर शेख यांच्यासोबत पक्षाचे माजी नगरसेवक अनिल चौघुले, राजेश बेन्स, नवनाथ मुरडनर, महेश थोरात, राजू खुळे, मंगेश देसाई, सिद्धेश कोकाटे आधी कार्यकर्त्यांनी आणि दिवाळीत संकटात सापडलेल्या थोरात कुटुंबीयांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला.

या संदर्भात ग्रामीण भागात आणि विशेषता शेतात वस्ती करून राहणाऱ्या कुटुंबांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने प्रबोधनाची मोहीम घ्यावी. बिबट्यांची वाढलेली संख्या आणि हल्ले धक्कादायक आहेत. त्यातून सावरण्यासाठी आणि बचाव करण्यासाठी वनविभागाकडे मदतीची अपेक्षा असल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT