Ashok Kharat News : भोंदू कॅप्टन अशोक खरात याचा गवगवा करणाऱ्यांनाच त्याची किंमत मोजावी लागत आहे. एसआयटी पथकाने सुरू केलेल्या तपासात अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. राजकीय नेत्यांबरोबरच अनेक बिल्डर देखील खरातच्या गळाला लागले होते.
पुणे येथील एका बांधकाम व्यावसायिकाला सलग पाच वर्ष खरात लुटत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या बिल्डरने कॅप्टन खरातला चक्क मर्सिडीज गाडी भेट दिली होती. खरातने दबाव आणून ही गाडी स्वतःच्या नावे केली.
खरातने या बिल्डरकडून चार ते पाच कोटी रुपयांची वसुली केली. ही वसुली होती की खंडणी याचा तपास 'एसआयटी'च्या पथकाकडून केला जात आहे. हा तपास करताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. संबंधित बिल्डरसोबत खरातने सलग पाच वर्ष विविध देशांचा परदेश दौरा केला. या दौऱ्यात व्यवसायिक भरभराट करण्यासाठी खरात याने जादूटोणा आणि तंत्रमंत्र याद्वारे बिल्डरला फसवले अशी तक्रार आहे.
एखाद्या व्यवसायिकाला तंत्र मंत्र करून सलग चार ते पाच वर्ष लुटले जात होते. यादरम्यान कोट्यावधी रुपयांची वसुली झाली. ही वसुली होती ती खंडणी याचा तपास केला जात आहे. पोलिसांनी बिल्डर कडून खरात खंडणी घेत होता असा दावा न्यायालयापुढे केला आहे. त्यामुळे खंडणी वसुलीची ही पद्धत काय होती? याची देखील चर्चा आहे.
भोंदू खरात याच्या विरोधात नाशिक पोलिसात नऊ गुन्हे दाखल आहे. या सर्व गुन्ह्यात न्यायालयाकडून विविध वेळी पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या सर्व गुन्ह्यांचा तपास उद्या संपणार आहे. त्यामुळे पोलीस न्यायालयापुढे खरात बाबत काय भूमिका घेतात याची उत्सुकता लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.