Maharashtra Assembly
Maharashtra Assembly Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

उमेदवार दिलदार असल्याने निवडणूक बिनविरोध होऊनही मतदारांत खुषी!

Sampat Devgire

धुळे : विधान परिषदेची निवडणूक म्हटले की, त्यासाठी मतदार असलेले नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांची कळी खुलते. या निवडणुकीला मोठा खर्च का येतो हे `ओपन सिक्रेट` आहे. मात्र निवडणूक बिनविरोध झाल्याने राज्यभर मतदारांचा कंठ दाटून आला असला तरी, धुळ्यात मात्र उमेदवार दिलदार असल्याने मतदारांची खुषी कायम आहे.

वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुका मर्यादीत मतदार असल्याने सामान्यांच्या आवाक्यात राहिलेल्या नाहीत. ते `ओपन सिक्रेट` आहे. प्रत्येक मतदाराचे मत मिळवायचे म्हणजे त्यासा आपलेसे करावे लागते. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य ही गावगुंडीच्या राजकारणात मुरलेली मंडळी मतदार असल्याने त्यांचे मत मिळवणे सोपे नसते. त्यात सहली, पंचतारांकीत आदरातिथ्य, तीर्थ-प्रसाद सगळेच आले. जेव्हढे शहर राजकीयदृष्ट्या जागरूक, जेव्हढी काठावरची लढाई तेव्हढा या मतदारांचा `भाव` वधारतो. त्यामुळे निवडणूक आवडे सर्वांना हे चपखलपणे विधान परिषदेच्या मतदारांनाच लागू होते. यंदा मात्र बिनविरोध निवडणूकीमुळे राज्यातील जीथे जीथे मतदान होणार होते, तीथे तीथे मतदारांनी बॅगा भरून सहलीला जाण्याची सगळीच तयारी केली होती. मात्र बातमी आल्यावर काहींना अक्षरशः हुंदका आला.

याबाबतीत धुळे- नंदुरबारचे मतदार नशिबवाण आहेत. येथे सुमारे ३४० मतदार होते. त्यात काँग्रेसच्या ७४ सदस्यांसह महाविकास आघाडीची संख्या १४५ होती. भाजपकडे सुमारे १८० मतदार होते. त्यामुळे भाजपचे पारडे जड होते. मात्र पराभव दिसत असताना कोणता उमेदवार रिस्क घेणार. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. तरीही त्यात कोणताही पक्षीय भेदाभेद न करता उमेदवार `दिलदार` असल्याने त्यांची काही सपशेल निराशा झालेली नाही. प्रसाद प्रत्येकाला मिळणार असल्याच्या बातम्यांनी त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य कायम आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या धुळे व नंदुरबार विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक २००९ पासून आत्तापर्यंत २०१५ चा अपवाद वगळता बिनिवरोध होत आहे. यापूर्वी २०१५ चा अपवाद वगळता ते बिनविरोध या मतदारसंघातून विधान परिषदेवर प्रतिनिधित्व करीत आहेत.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT