Rohit Pawar, Rohini Khadse & Others Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

कितीही त्रास द्या, एकनाथ खडसे सहीसलामत सुटतील!

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते, कर्जत- जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी आज मुक्ताईनगर येथे भेट दिली.

Sampat Devgire

मुक्ताईनगर : राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेली कारवाई ही राजकीय आकसाने करण्यात येत आहे. ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे (NCP leader Eknath Khadse) आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील नाहक त्रास दिला जात आहे. त्यातुन ते सहीसलामत बाहेर येतील हा माझा विश्वास आहे, असे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते, कर्जत- जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी आज मुक्ताईनगर येथे भेट दिली. त्यांनी मुक्ताई मंदिरात आदिशक्ती मुक्ताईचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले, एकनाथराव खडसे, रोहिणीताई खडसे यांनी गेल्या वर्षां राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे या भागातील कार्यकर्त्यांत नवचैतन्य आले आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले. नवे, जुने, गट- तट न मानता येथील सर्व कार्यकर्ते एकदिलाने पक्षाचे काम करीत आहेत. कालच जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीचे सहा उसंचालक बिनविरोध निवडून आले. जिल्हा बँक निवडणुकीत देखील पॅनेलला घवघवीत यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांत पक्षाला चांगले यश मिळेल. त्यासाठी सर्वानी एकजुटीने मेहनत घ्यायची आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र भैय्या साहेब पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदनाताई चौधरी, सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील, किसान सेलचे जिल्हा अध्यक्ष सोपान पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, उपाध्यक्ष विनोद तराळ, तालुका अध्यक्ष यु. डी. पाटील, पंचायत समितीचे सभापती विकास पाटील, किशोर गायकवाड, दिपक पाटील, पवन पाटील, शाहिद खान उपस्थित होते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT