Centre Minister Dr Bhagwat Karad in programme 

 

Jalgaon

उत्तर महाराष्ट्र

भागवत कराड यांनी दिले दोंडाईचाला ५० कोटी गिफ्ट!

विकास प्रकल्पाच्या लोकार्पणप्रसंगी उपस्थित केंद्रीय मंत्री भागवत कराड उपस्थित राहिले.

Sampat Devgire

धुळे : दोंडाईचा पालिका क्षेत्रातील भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव राज्य सरकारने अडविल्याचे कळाले. त्यामुळे पुढील काळात या योजनेसाठी केंद्र सरकारकडून ५० कोटींचा निधी दोंडाईचाला देण्याची ग्वाही केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr Bhagwat Karad) यांनी दिली.

दोंडाईचा (Dondaicha city) येथील अमरावती नदीकाठी रिव्हर फ्रंट विकासाअंतर्गत रस्ते, पथदिवे या सुमारे तीस कोटींच्या कामांचे, सहा कोटी २५ लाख खर्चाचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि बायोगॅस प्रकल्पाचे मंत्री डॉ. कराड यांच्या हस्ते सोमवारी लोकार्पण झाले. तसेच वंजारी समाज मंगल कार्यालयाचा लोकार्पण सोहळा झाला. उद्योगपती सरकारसाहेब रावल, भाजपचे (BJP) खासदार डॉ. सुभाष भामरे, (DR. Subhash Bhamre) आमदार जयकुमार रावल, नगराध्यक्षा नयनकुवर रावल, उपनगराध्यक्ष नबू पिंजारी, मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकमआदी उपस्थित होते.

मंत्री कराड म्हणाले, की उत्तर महाराष्ट्रासाठी पुढील काळात लवकरच बैठक घेणार असून याठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेची गरज असेल किंवा डिजिटल व्यवहारासाठी ज्या आवश्यक सुविधा लागतील त्यासाठी तत्परतेने निर्णय घेतले जातील. दोंडाईचा शहराचा आमदार रावल यांच्यामुळे विकास होत आहे. त्यांचे केंद्रीय मंत्रिमंडळात चांगले वजन आहे. त्यामुळे अनेक केंद्रीय मंत्री विविध विकास कामांच्या उद्‌घाटनासाठी येत आहेत. डॉ. भामरे, श्री. रावल यांनी मनोगत व्यक्त केले.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT