नाशिक : केंद्र सरकारने गतवर्षी एकतर्फी निर्णय घेत लागू केलेले तिन्ही कृषी विधेयके आज मागे घेत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. हा शेतकऱ्यांच्या अभूतपुर्व एकजुटीचा विजय असून या आंदोलनाची देशाच्या इतिहासात व जगात नोंद घेतली जाईल, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले.
यासंदर्भात श्री. भुजबळ म्हणाले, आज सकाळीच एक चांगली बातमी ऐकायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी मंजूर केलेले कृषी कायदे सर्व मागे घेतले आहेत. त्याबद्दल एक वर्षाहून अधिक काळ लाखो शेतकरी आंदोलन करीत होते. त्या कायद्यांना विरोध करीत होते. उत्तर प्रदेश सीमेवर धरणे धरून बसले होते. महात्मा गांधी यांच्या मार्गाने सत्याग्रह करीत होते. उन्हात, पावसाता आणि कोरोनाच्या महामारीचा कहर सुरु असताना त्यांनी धैर्याने व एकजुटीने आंदोलन केले. हे सगळे शेतकरी बायका मुलांसह धरणे धरून बसले होते. त्यात शेकडो लोक मृत्यूमुखी पडले. हा शेतकऱ्यांचा लढा अतिशय अभूतपुर्व असा होता. तो या देशाच्या इतिहासामध्ये त्याची नोंद होईल. कदाचीत जागतिक आंदोलनात देखील त्याचा उल्लेख निश्चितच होईल.
अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतला, त्यामागे अनेक कारणे आहेत. अलिकडे ज्या काही पोटनिवडणूका झाल्या, त्यामध्ये देखील भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला. नाही म्हटले तरी फटका बसलेलाच आहे. आत्ता पुन्हा उत्तर प्रदेश सहीत अनेक प्रांताच्या निवडणुका येत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्याची आवश्यकता भासली की काय याचा विचार आपल्याला करावा लागेल. परंतू काही का असेना, देर आये दुरुस्त् आये. सर्व शेतकऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो.
....
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.