Dr Bharti Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

देशात अठरा वर्षे वयोगटाखालील लसीकरणाची तयारी सुरू

जिल्ह्यात लवकरच एक आरोग्य महाविद्यालय सुरू केले जाणार आहे.

Sampat Devgire

येवला : अठरा वर्षे वयोगटाखालील युवकांना लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत तयारी सुरू आहे. प्रशिक्षण देण्यात येत असून आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक आरोग्य महाविद्यालय लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी दिली.

येथील स्री रोग तज्ञ व राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे शहराध्यक्ष डॉ.चंद्रशेखर क्षत्रिय यांनी नाशिक त्यांची भेट घेऊन आरोग्यविषयक मागण्यांचे निवेदन दिले,त्यावेळी त्या बोलत होत्या. कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून महाविद्यालयांचे कामकाज विस्कळीत होऊन विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे लसीकरणाला गती देऊन १८ वर्षाखालील युवकांचे देखील लसीकरण करावे अशी मागणी डॉ. क्षत्रिय यांनी केली. यावर मुलांना लस देण्यासाठी नियोजन सुरू आहे. केंद्र सरकार आरोग्य विभागावर मोठ्या प्रमाणावर खर्च करत असून भविष्यात आरोग्य विभाग अधिक सक्षम होण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी आरोग्य महाविद्यालय सुरू करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

काही जण लसीकरणाकडे दुर्लक्ष करत आहेत, मात्र स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नागरिकांनी स्वतःहून लसीकरण पूर्ण करायला पाहिजे. नागरिकांनी स्वतःहून पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT