Ex MLA Janubhau Aher with Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शरद पवारांच्या भेटीत उजळले शंभरीतील माजी आमदारांचे ऋणानुबंध!

शंभरी पुर्ण केलेल्या माजी आमदार जनुभाऊ आहेर यांनी शनिवारी शरद पवार यांची भेट घेतली.

Sampat Devgire

नाशिक: शंभरी पार केलेले येथील माजी आमदार जनुभाऊ आहेर यांनी रविवारी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची नाशिक येथे एमरॉन पार्क येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीत पन्नास वर्षांपूर्वीच्या ऋनानुबंध सुखद आठवणींना या दोन्ही नेत्यांनी उजाळा दिला.

या वेळी उभयतांनी एकमेकांस शुभेच्छांची देवाणघेवाण करत प्रदीर्घ काळानंतर झालेल्या भेटीने आनंद व्यक्त केला. श्री. पवार म्हणाले की, शतकोत्तर प्रवास करणाऱ्या सहकाऱ्याच्या भेटीने वेगळे समाधान वाटले.

माजी आमदार जनुभाऊ आहेर यांनी १९७२ ते ७७ या कालावधीत तत्कालीन चांदवड - कळवण मतदारसंघातून आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. त्यावेळी ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. इंदिरा गांधींची लाट असताना श्री. आहेर हे लोकांत सहज मिसळून त्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करीत असत. त्या बळावरच ते प्रस्थापित काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात निवडून आले. त्यावेळी शरद पवार प्रारंभी राज्याचे कृषिमंत्री व नंतर आरोग्यमंत्री झाले. या कालावधीत पाण्याच्या प्रश्नावरील श्री. आहेर यांचा व्यासंग श्री. पवार यांना भावला. त्यातून त्यांचा संपर्क वाढला. या संपर्क व संवादातून पुढे आहेत काँग्रेस पक्षात सहभागी झाल्याचे श्री. आहेर यांनी `सरकारनामा`ला सांगितले.

श्री. आहेर यांनी नुकतेच वयाचे शतक पूर्ण केले. अजुनही त्यांची प्रकृत्ती उत्तम आहे. सकाळी उठल्यावर चालने, त्यानंतर चहा- बिस्कीटे दुपारी भोजन ते घेतात. भोजन घेतल्यावर दुपारी ते झोपतात. त्यानंतर सायंकाळी पुन्हा चालायला जातात. राजकीय घडामोडी व सामाजिक विषयांची माहिती ते घेतात. त्यावर अनेकांशी चर्चा देखील करतात, असे त्यांचे चिरंजीव विजय आहेर यांनी सांगितले.

या भेटीवेळी पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार दिलीप बनकर, सरोज आहिरे, हेमंत टकले, माजी आमदार दीपाली चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, येथील माजी नगरसेवक उमेश आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT