धुळे : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शनिवारी सकाळी सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषदेत (Dhule) स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत जिल्हा परिषदेच्या (ZP) मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस. (Bhuvneshwari S.) यांनी स्वतः हातात झाडू घेऊन साफसफाई केली. सर्व विभागप्रमुख व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला. (Ceo & Officers take drive of cleanlyness drive in ZP)
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे शासन स्तरावरून सूचित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी शनिवारी सकाळी आठ ते अकरादरम्यान जिल्हा परिषद कार्यालय व परिसर स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मोहीम राबविण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस. यांनी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला. त्यामुळे उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही स्वछतेसाठी हाती झाडू घ्यावा लागला.
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रारंभी आपापली कार्यालये स्वच्छ केली. फाइलींची व्यवस्थित मांडणी केली. त्यानंतर परिसर स्वच्छ केला. सीईओ श्रीमती भुवनेश्वरी एस., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली गेली.
पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अस्लम तडवी, बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत भदाणे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मनीष पवार, शिक्षणाधिकारी(माध्यमिक) मोहन देसले, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पड्यार, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय देवरे, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता साजिद सय्यद, कृषी विकास अधिकारी प्रमोद सोनवणे यांच्यासह इतर अधिकारी- कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभाग नोंदविला.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.