Jalgaon Politics : चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण हे भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचे जिगरी मित्र मानले जातात. महाजन यांनी जामनेर मध्ये तर चव्हाण यांनी चाळीसगावमधून नगराध्यपदासाठी आपआपल्या सौभाग्यवतींना रिंगणात उतरवले होते. त्यात महाजन यांना पत्ती साधना यांना बिनविरोध करण्यात यश आलं. पण मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा यांना चाळीसगाव नगरपालिकेत निवडणुकीला सामोरे जावे लागले.
चाळीसगाव नगरपरिषद निवडणुकीचा निकाल आज लागला. त्यात भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी बाजी मारली आहे. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रतिभा चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार पद्मजा देशमुख यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. या विजयामुळे चाळीसगाव नगरपरिषदेवर भाजपने सलग दुसऱ्यांदा आपला झेंडा फडकवला असून, एकहाती सत्ता काबीज केली आहे.
विशेष म्हणजे निकाल लागण्यापूर्वीच शहरात प्रतिभा चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर्स लावण्यात आले होते. आमदार मंगेश चव्हाण यांच्या समर्थकांना विजयाचा ठाम विश्वास होता. मतमोजणी सुरू होण्याआधीच कार्यकर्त्यांनी लावलेल्या या बॅनर्समुळे शहरात मोठी चर्चा रंगली होती.
मंगेश चव्हाण हे भाजपचे मुरब्बी नेते आहे. ते चाळीसगावचे आमदार आहेत. त्यांनी आपल्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांच्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. त्याचवेळी तर पद्मजा देशमुख या दिवंगत माजी आमदार राजीव देशमुख यांच्या पत्नी असल्याने ही निवडणूक खऱ्या अर्थाने दोन दिग्गज राजकीय घराण्यांमधील वर्चस्वाची लढाई होती. त्यात चव्हाण घराण्याने बाजी मारली. केवळ नगराध्यक्ष पदच नव्हे, तर नगरसेवक पदाच्या निवडणुकीतही भाजपने चांगली कामगिरी केली.
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना पडलेली मते
प्रतिभा चव्हाण - ३२२३८
राहूल जाधव - ४३४
पद्मजा देशमुख. - २६२२६
समाधान पाटील. - ३५३
भाजपाच्या उमेदवार प्रतिभा चव्हाण या ६०१२ मतांनी विजयी झाल्या आहेत
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.