चाळीसगाव (जळगाव) : गावकऱ्यांकडून कर वसुलीसाठी ग्रामपंचायतीने नवीन शक्कल लढवली आहे. ज्या गावकऱ्यांनी वेळेत मालमत्ताकर भरला आहे. त्यांना दिवाळीनिमित्त पाच किलो साखर भेट दिवाळी भेट म्हणून देण्यात असून त्या व्यक्तीला वर्षभर मोफत दळण दळून दिले जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील उपखेड (Chalisgaon) (ता. चाळीसगाव) येथील ग्रामपंचायतीनं (Gram Panchayat) हा अनोखा उपक्रम राबविला आहे. गावातील बिनविरोध लोकनियुक्त सरपंच महेश मगर यांनी गावात करवसुली विषयी गावातील लोकांचे मतपरिवर्तन केले. त्यानंतर वेळेत करभरणा करण्यासाठी गावकरी पुढे आले. यंदा पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाल्याने शेतकरीवर्ग चितेंत आहे, त्यांना दिलासा देण्यासाठी दिवाळीनिमित्त ग्रामपंचायतीने ही भेट दिली आहे. खासदार उन्मेष पाटील (mp Unmesh Patil) यांच्या हस्ते वेळेत कर भरणा केलेल्या गावकऱ्यांना पाच किलो साखर भेट देण्यात आली.
कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी तालुक्यातील गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर व महाराष्ट्र ग्रामसेवक संघटनेचे कोषाध्यक्ष संजीव निकम, पिलखोड ग्रामपंचायतचे ग्रामविस्तार अधिकारी जयवंत येवले यांनी परिश्रम घेतले. २०११च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या २५६६ आहे. त्यापैकी २३५ कुटुंबांनी पूर्ण करभरणा केलेला आहे. पाच किलो साखर मोफत मिळत असल्यामुळे अनेक गावकरी कर भरण्यासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे करवसुलीला वेग आला आहे. गावातील शाळेला संपूर्ण डिजिटल करण्यात आले आहे. गावाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात, असे सरपंच महेश मगर यांनी सांगितले.
धुळे कचरा भ्रष्टाचार; भाजपचे ५२ पैकी ४७ नगरसेवक तुरुंगात जातील!
धुळे : शहरातील कचरा ठेक्याच्या उलाढालीत ठेकेदार वॉटरग्रेस (Watergrace compony) कंपनीपेक्षा सर्वाधिक भाजपनेच (BJP) डल्ला मारला आहे. त्यांनी कचऱ्यातही पैसे खाऊन शहरात घाण केली, असा गंभीर आरोप शिवसेना (Shivsena) नेत्यांनी केले आहे. रस्ते, खड्ड्यांप्रश्नी शिवसेनेची आंदोलने नव्हे तर निवडणूक समोर ठेऊन केलेली नौटंकी होती, अशी टीका महापौर प्रदीप कर्पे यांनी केली होती. त्याला शिवसेनेने पत्रकार परिषदेत कडवट शब्दांत प्रत्युत्तर दिले. पात्रता नसताना महापौर पद मिळाल्याने शहराचे कर्पे यांनी शहराचे वाटोळे केले. ते महापालिकेतील लबाडांचे सरदार आहेत, अशा खोचक शब्दांत शिवसेनेने महापौर कर्पे यांच्यावर पलटवार केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.