Chandrakant Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

`महाराष्ट्रात आता कोणत्याही क्षणी आणीबाणी लागू होईल`

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी भाजपचा मेळावा झाला.

Sampat Devgire

नाशिक : राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे जनतेच्या मूलभूत प्रश्‍नांकडे दुर्लक्ष झाले असून, कायदा सुव्यवस्था मोठ्या प्रमाणात ढासाळली आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी आणीबाणी लागू होईल, अशी परिस्थिती आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले.

मात्र, असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकशाहीवादी असल्याने असे होणार नाही, अशी टिप्पणी जोडतानाच त्यांनी इंदिरा गांधींच्या सत्ताकाळात १९ वेळा आणीबाणी लागल्याची आठवण करून दिली. नगरसेवक दिनकर पाटील यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय तसेच विविध उद्‌घाटनांच्या कार्यक्रमांसाठी नाशिक दौऱ्यावर आले असताना प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी ‘सकाळ’च्या एमआयडीसी कार्यालयाला भेट दिली.

यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा करताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर त्यांनी टीका केली. २०१४ ते २०१९ या कालावधीत राज्यात एकही दंगल झाली नाही. मुख्यमंत्री पदाबरोबरच गृहमंत्रिपदाची जबाबदारी श्री. फडणवीस यांनी योग्यरीत्या सांभाळली. त्या काळात राज्यात क्राईमचा रेट कमी होता. अधिकाधिक केसेस नोंदविण्याचे फर्मान त्यांनी काढल्याने कायद्याचा धाक वाढला होता. आता कायद्याचा धाक राज्यात संपला आहे. दंगली घडत आहेत. सर्वसामान्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. गुन्हेगार जामीनावर बाहेर फिरत आहेत. सर्वत्र गोंधळ माजला आहे.

ते म्हणाले, एसटी कर्मचारी संपावर गेल्याने कामगार, मजुरांचे हाल होत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. सरकार त्यांच्याशी चर्चा करत नाही, ही बाब दुर्दैवी असल्याचे सांगतानाच, या सर्व परिस्थितीचा विचार करता आणीबाणी लागू होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी स्वागत केले.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT