Chandrakant Patil-Eknath Khadse
Chandrakant Patil-Eknath Khadse sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शिवसेना गुपचूप काही करत नाही; सर्वकाही खुलेआम करते : खडसेंना पाटलांचे उत्तर

सरकारनामा ब्यूरो

जळगाव : शिवसेना पक्ष हा (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. आम्ही गुपचूप काही करत नाही, जे करतो ते समोर करतो, असा टोला मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना नाव न घेता लगावला. (Chandrakant Patil's reply to Eknath Khadse's allegation)

बोदवड नगरपंचायतीच्या निकालानंतर आमदार चंद्रकांत पाटील हे पहिल्यांदाच जळगावात आले होते. त्यावेळी त्यांनी बोदवडच्या निकालावर प्रथमच भाष्य केले. एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या गुपचूपपणे केलेल्या युतीबद्दल वक्तव्य केले होते. त्याला उत्तर देताना आमदार पाटील यांनी वरील उत्तर दिले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, बोदवड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे ९ उमेदवार निवडून आले आहेत, याचा अर्थ जनतेचा कौल शिवसेनेच्या बाजूने आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून येत्या तीन वर्षांत बोदवड शहराच्या विकासाला प्राधान्य देण्यात येणार आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक घेण्यात आली. बैठक झाल्यानंतर आमदार पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी खडसेंच्या आरोपाला पाटील यांनी उत्तर दिले.

काय म्हणाले होते एकनाथ खडसे?

बोदवड नगरपंचायत निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष आमच्या विरोधात एकत्र आले होते. त्यांच्यात छुपी युती होती. मात्र या पराभवाचे चिंतन करू, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले होते. बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सात जागा मिळाल्या आहेत. दोन जागांवर आमचा निसटता पराभव झाला आहे. एक जागा ईश्वर चिठ्ठीने गेली तर एका जागेवर आमचा उमेदवार केवळ सहा मतांनी पराभूत झाला. शेवटी पराभव हा पराभवच आहे.

या ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची छुपी युती होती. त्यात भाजप नेते गिरीश महाजन आणि स्थानिक आमदारांची चर्चाही झाल्याचे लोकांनी पाहिले आहे. वर्तमानपत्रांमध्ये त्याची छायाचित्रेही प्रसिद्ध झालेली आहेत. त्यामुळे फक्त राष्ट्रवादीचा पराभव करण्याच्या हेतूने सर्व राजकीय पक्ष एकत्र आल्याचे चित्र दिसत होते. तरीही बऱ्यापैकी यश आम्हाला मिळाले. दुर्दैवाने ईश्वर चिठ्ठीमुळे आम्ही मागे पडलो; अन्यथा आम्ही बहुमतापर्यंत पोचलो असतो. तरीही हा पराभव का झाला, याची कारणमिमांसा करण्याची गरज आहे. त्याचे चिंतन आम्ही निश्चितपणे करू, असे खडसे यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT