Uddhav Thakrey
Uddhav Thakrey Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

चंद्रकांत रघुवंशी आमदारकीच्या लालसेने शिंदे गटात गेले!

Sampat Devgire

नंदुरबार : जिल्ह्यातील (Nandurbar) शिवसैनिकांची (Shivsena) संवाद साधताना श्री ठाकरे (Uddhav Thakrey) म्हणाले माझे नंदुरबार जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाले होते, हे मला मान्य आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuwanshi) आमदारकीच्या लालसेवे बंडखोरा गटाला मिळाले, असेही त्यांनी सांगितले. (Uddhav Thakrey agree that he niglected Nandurbar Organisation)

नंदुरबार येथील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काल मुंबईत पक्षप्रमुख ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, दिवासी भागात सातपुडा पर्वतरांगेत शिवसेनेचे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून शिवसैनिक प्रामाणिकपणे करत आहे त्यांना ताकद देण्यासाठी विधान परिषद निवडणुकीत जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांना उमेदवारी दिली आमश्या पाडवी यांच्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेला भक्कम बळ देण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले मात्र दुर्दैवाने याच दरम्यान काहींनी विश्वासघात केल्यामुळे अभूतपूर्व परिस्थिती उद्भवली आहे.

या संकट समयी नंदुरबार जिल्ह्यातील शिवसैनिक माझ्यावर विश्वास व्यक्त करून पक्षाशी एकनिष्ठ आहेत ही गौरवस्पद बाब आहे. येत्या काळात मी नंदुरबार जिल्ह्याचा दौरा करणार असून प्रत्यक्ष नागरिक व शिवसैनिकांशी भेटी घेऊन संवाद साधेल.

श्री. ठाकरे म्हणाले, विधानसभेच्या निवडणुश्रकीपूर्वी तत्कालीन विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी माझी भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे नंदुरबार जिल्ह्यात आदिवासीबहुल भागात शिवसैनिकांना बळ मिळेल, यासाठी मी त्यांना सत्ता आली तर तुम्हाला विधान परिषदेत पुन्हा आमदारकी देईल, असा शब्द दिला होता.

मी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या यादीत श्री रघुवंशी यांचे नाव पाठवून माझा शब्द पाळला होता. मात्र दुर्दैवाने गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात राज्यपालांनी या यादीला मंजुरी दिली नाही. परिणामी ते आमदार झाले नाहीत, अशा परिस्थितीत त्यांनी शिवसेना सोडली

श्री ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत, विनायक राऊत, विधान परिषद सदस्य सचिन अहीर, धुळे -नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनीही नंदुरबार जिल्ह्यातील शिवसैनिकांची चर्चा करून त्यांचे प्रश्न व अडचणी समजून घेतल्या.

यावेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती गणेश पराडके, माजी जिल्हा उपप्रमुख सुनील सोनार, माजी नगरसेवक विनोद चौधरी, जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले, जिल्हा युवा अधिकारी ललित जाट, युवा सेना जिल्हा समन्वयक रोहित चौधरी, जगदीश चित्रकथी, अक्कलकुवा तालुका उपप्रमुख तुकाराम वळवी, शहर प्रमुख रावेंद्रसिंह चंदेल, कुलदीप टाक, नरेंद्र जोशी, शाकीब पठाण यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----

श्री.रघुवंशी हे आमदारकीच्या लालसेने शिवसेनेत आले होते. आमदारकी मिळाली नाही तर ते पुन्हा शिवसेनेला सोडून गेले.

- उद्धव ठाकरे पक्षप्रमुख शिवसेना

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT