PM Modi in Shirdi  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

PM Modi Shirdi Visit : शिर्डीत मोदींना भेट दिलेला मंगलकलश, तलवारीची वैशिष्ट्ये माहिती आहेत का ?

Rashmi Mane

Narendra Modi Shirdi Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाचे जलपूजन आणि डाव्या कालव्याचे लोकार्पण झाले. यानंतर मोदींनी एका जाहीर सभेला संबोधित केले. तत्पूर्वी पंतप्रधान मोदींचा सभास्थळी राज्याचे महसूलमंत्री आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष भेटवस्तू देऊन सत्कार केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान मोदींचा सत्कार करताना सर्वप्रथम त्यांना महाराष्ट्राचा पारंपरिक पैठणीचा फेटा बांधला गेला. यानंतर शाल, पुष्पगुच्छ, साईबाबांची मूर्ती, श्रीराम व सीतेची मूर्ती, मंगलकलश देण्यात आला. याशिवाय मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील सर्व गावांची माती ठेवलेला आणखी एक मंगल कलश राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. यानंतर मोदींना भगवान विष्णूचे दहा अवतार चितारलेली एक खास तलवारही भेट स्वरूपात देण्यात आली.

यानंतर जैविक शेतीवर आधारित ''धरती करे पुकार'' हा नृत्य कार्यक्रम सादर करण्यात आला. सर्वप्रथम राधाकृष्ण विखे पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाषणं झाली.

मोदींनी साडेसात हजार कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. तसेच, या वेळी मोदींनी हभप बाबा महाराज सातारकर यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत, त्यांच्या कार्याची महती सांगितली आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT