OBC Reservation  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

OBC Reservation: टिकली पुसून आडवं कुंकू लावा, मगच आमच्यासोबत या! मेळाव्यापूर्वी OBC आक्रमक

Chhagan Bhujbal Ahmednagar OBC Melava ः ओबीसी एल्गार मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये तालुकानिहाय बैठकांचा जोर

Pradeep Pendhare

Nagar : ओबीसी एल्गार मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात तालुकानिहाय बैठकांचा जोर वाढला आहे. 'प्रत्येक ओबीसीने नव्हेच, तर संविधान वाचवणार्‍या प्रत्येकाने अधिसूचनेवर हरकत घेतली पाहिजे,' असा निर्धार बैठकीतून केला जात आहे. 'टिकली पुसून आडवं कुंकू लावा मग आमच्यासोबत या', असा सूर बैठकांमध्ये उमटू लागला आहे.

श्रीरामपूर येथील खैरी निमगाव येथे ओबीसी समाजाच्या एल्गार मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. भाऊसाहेब वारूळे अध्यक्षस्थानी होते. समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले, चंदक्रांत झुरंगे, रावसाहेब जावळे, बाळासाहेब जावळे उपस्थित होते.

प्रशांत शिंदे यांनी ओबीसी समाजाने जागृत राहिले पाहिजे. रात्र वैऱ्याची आहे. ज्ञानाच्या जोरावर ओबीसी समाज जागृत असून, आता ज्ञानाची मशाल काय असते, हे दाखवून देण्यासाठी अधिसूचनेवर हरकती नोंदवा, असे आवाहन केले. लोकशाहीच्या नावाखाली हे सरकार हुकूमशाही करीत आहे. मागासलेल्या समाजावर अन्याय करण्याचे धोरण सरकार राबवत असल्याचा आरोप चंद्रकांत झुरंगे यांनी केला.

'टिकली पुसून आडवं कुंकू लावा, मगच आमच्यासोबत या. स्वागत करू,' ओबीसी समाज हा निर्मितीचा जनक असल्याचे रावसाहेब जावळे यांनी म्हटले आहे. ओबीसींना स्वतःचे अस्तित्व आहे. ते जपले पाहिजे. आता हेच अस्तित्व धोक्यात आणले जात आहे. यासाठी एक झाले पाहिजे, असे आवाहन एकनाथ नागले यांनी केले.

नगरमध्ये तीन फेब्रुवारीला होत असलेला एल्गार मेळावा यशस्वी करण्यासाठी आणि सरकारला ओबीसींची ताकद दाखवून देण्यासाठी ओबीसी नेते गावपातळीवर चांगलेच आक्रमक झाले आहे. बैठकांमधून मेळाव्याला येण्याचे आवाहन करण्याबरोबर अधिसूचनेवर हरकती घेण्याचे सूचवले जात आहे. यातच मराठा आरक्षणाचा संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांनी ओबीसी आरक्षणाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतर ओबीसी समाजातील अधिक नेते आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT