Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : बाळासाहेब ठाकरेंनी खरंच PM मोदींना मदत केली होती का? भुजबळांचे शरद पवारांकडे बोट

Chhagan Bhujbal on Balasaheb Thackeray's support to Modi : भुजबळ म्हणाले, मी आजून संजय राऊतांनी लिहलेलं पुस्तक वाचलेलं नाही. पण, पीएम नरेंद्र मोदी हे दोन हजार सालानंतर मुख्यमंत्री झाले. मी मात्र, १९९२ मध्येच शिवसेना सोडली आहे. त्यामुळे..

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी लिहलेल्या 'नरकातील स्वर्ग' या पुस्तकाचा उद्या मुंबईत प्रकाशन सोहळा होणार आहे. या पुस्तकात संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यांवरुन राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना कशाप्रकारे मदत केली याविषयी पुस्तकात दावा केला आहे.

यासंदर्भात पत्रकारांनी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना विचारले असता भुजबळांनी मोजक्या शब्दात उत्तर देत विषय संपवला. भुजबळ म्हणाले, मी अजून राऊतांनी लिहलेलं पुस्तक वाचलेलं नाही. पण, नरेंद्र मोदी हे दोन हजार सालानंतर मुख्यमंत्री झाले. मी मात्र, 1992 मध्येच शिवसेना सोडली आहे. त्यामुळे स्वर्गीय बाळासाहेबांनी नरेंद्र मोदी यांना मदत केली याविषयी मला काहीही अधिकृत माहिती नाही. दुर्देवाने बाळासाहेब ठाकरे आपल्यात नाहीत. त्यामुळे शरद पवार साहेबच याविषयी काय ते सांगू शकतात असं सांगून भुजबळांनी अधिक बोलणं टाळलं.

त्याकाळी बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी या नेत्यांनी हिंदुत्वाची भूमिका मांडली होती. त्यामुळे कदाचित काहीतरी मदत झाली पण असेल असेही भुजबळ यांनी यावेळी म्हटले. कुणी काय लिहावं, काय बोलावं यावर आपण कसं काय बंधन टाकणार असं भुजबळ म्हणाले.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असे बोलले जात आहे. त्याविषयी विचारले असता भुजबळ म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असे मला वाटत नाही. अजित पवार यांनीच तसे स्पष्ट केल्याचे भुजबळ म्हणाले. त्यामुळे या चर्चेत काही तथ्य आहे असे मला वाटत नाही. काही लोकांची तशी इच्छा असू शकते परंतु तसा प्रस्ताव किंवा चर्चा वैगेरे काही नाही असं भुजबळ म्हणाले. अजित पवारांनी या सगळ्या उडवून लावलेल्या आहेत असं भुजबळ म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणून एकत्रित लढणार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आधीच सांगितलं आहे. परंतु या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यामुळे काही ठिकाणी त्याला अपवाद म्हणून स्वतंत्र निवडणुका लढवल्या जाऊ शकतात असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

मागच्या विधानसभेला सुद्धा अनेक ठिकाणी महायुतीच्या दोन पक्षांनी महाविकास आघाडीच्या विरोधात फॉर्म भरले होते. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये ते मोठ्या प्रमाणावर आहे. कारण शेवटी कार्यकर्त्यांनाही पुढे यावं लढावं अशी अपेक्षा असते असं भुजबळ म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT