Chhagan-Bhujbal-Girish-Mahajan.webp Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal Politics: पालकमंत्री पदाबाबत भुजबळ स्पष्टच बोलले, ‘स्थानिक मंत्री म्हणून सिंहस्थाचा आढावा घेणे, हा आपला अधिकारच’

Chhagan Bhujbal; Chhagan Bhujbal clearly said, as a local minister, it is my right to review the Simhasth Kumbh Mela-नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राजकीय चर्चांना दिला विराम

Sampat Devgire

Chhagan Bhujbal News: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक होत आहे. निमित्ताने पालकमंत्री पदाबाबतही चर्चा झाली. यावर भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी आज बैठक होत आहे. यानिमित्ताने माध्यमांत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांच्यातील राजकीय स्पर्धेची चर्चा घडली.नाशिकच्या पालकमंत्री पदाची देखील चर्चा घडली. या संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक घेतली म्हणजे मी पालकमंत्री झालो, असे नव्हे. यापूर्वीच्या दोन कुंभमेळ्यात विविध कामांमध्ये माझा सक्रिय सहभाग होता. त्याबाबत विविध जबाबदाऱ्या मी पार पाडले आहेत. त्या अनुषंगाने यंदाच्या कुंभमेळ्यात काय नवीन होते आहे, काय राहून गेले किंवा काय करणे आवश्यक आहे याची माहिती घेण्यासाठी ही बैठक होत आहे. याचा वेगळा अर्थ काढू नये.

नाशिक जिल्ह्यातील विविध विकास कामांमध्ये मी यापूर्वी देखील मनापासून लक्ष घातलेले आहे. नाशिक- मुंबई महामार्ग, नाशिकचा उड्डाणपूल, रिंग रोड, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील रस्त्यांची व विकासाची कामे, वाहतुकीचे नियोजन अशा विविध कामांमध्ये लक्ष घातले आहे. या संदर्भात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने प्रशासनाने काय आरेखन केले आहे, ही माहिती घेण्यासाठी बैठक होत आहे. काही त्रुटी असल्यास सूचना आणि सुधारणा करण्याबाबत मी निश्चितपणे प्रशासनाला सांगेल.

सिंहस्थ कुंभमेळा आगामी दोन वर्षांनी होत आहे. त्या दृष्टीने विकास कामांवर लवकर लक्ष देणे आवश्यक आहे. अनेकदा ऐनवेळी आणि घाई घाई कामे होतात. त्यात गुणवत्तेचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे सिंहस्थाची कामे लवकर सुरू झाली पाहिजे, माझे मत आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने बहुतांशी कामांचे क्लबिंग करण्यात आले आहे. स्थानिक कंत्राटदार यांना त्यामध्ये भाग घेता येऊ नये असा प्रयत्न आहे. याविषयीच्या तक्रारी स्थानिक कंत्राटदारांनी केले आहेत. भुजबळ यांनी त्याबाबत आपण प्रशासनाकडून माहिती घेऊ. कंत्राटदारांनी देखील त्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर संपर्क केला पाहिजे. न्यायालयात याचिका दाखल करणे हा देखील एक पर्याय आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यावर मार्ग काढता येईल, असे भुजबळ यांनी सांगितले.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केंद्र शासनाचा निधी मिळाला पाहिजे. याबाबत मुख्यमंत्री आपल्या स्तरावर दिल्लीत प्रयत्न करतील, अशी अपेक्षा आहे. मोठी कामे आणि एकाच कंत्राटदाराला कामे देणे याविषयी देखील त्यांनी नापसंती व्यक्त केली. एक रस्ता एकाच कंत्राटदाराला दिला आणि त्यात गोंधळ झाल्यास तो कसा निस्तरणार? असा प्रश्न भुजबळ यांनी केला.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT