Chhagan Bhujbal Discharged in Kalina Library Case : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना कथित भ्रष्टाचाराच्या एका महत्वाच्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
बहुचर्चित कलिना ग्रंथालय प्रकरणात सत्र न्यायालयाने मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता केली आहे. भुजबळ यांच्यासह या प्रकरणातील उर्वरित तीन संशयितांचीही न्यायालयाने पुराव्यांअभावी सुटका केली आहे. 24 सप्टेंबर 2026 रोजी न्यायालयाने हा निर्णय दिला.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरातील अत्यंत मोक्याच्या जागेवर ग्रंथालय उभारण्यासाठी राज्य सरकारला जागा देण्यात आली होती. विद्यापीठाने ग्रंथालयाच्या बांधकामासाठी सुमारे ४ एकर जागा राज्य सरकारला दिली होती.
छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री असताना 2009 मध्ये या चार एकर जागेच्या एका भागावर ग्रंथालय उभारण्यासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. या जागेचा एक भाग ग्रंथालयाच्या बांधकामासाठी वापरण्यात येणार होता तर उर्वरित भूंखड खासगी विकासकाला दीर्घ मुदतीच्या भाटेपट्ट्यावर देण्यात आल्याचा आरोप झाला. ACB ने या प्रकरणात 2015 मध्ये गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ACB च्या आरोपानुसार, उर्वरित जागा एका विकासाला 99 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर केवळ 1 रुपया प्रति चौरस मीटर या नाममात्र दराने देण्यात आली होती. या मोबदल्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन मंत्री म्हणून छगन भुजबळ यांनी कथितरित्या कंत्राटदाराकडून किकबॅक घेतल्याचा आणि विकासकाला अनुकूलता दाखवल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला होता.
सत्र न्यायालयाने या प्रकरणात महत्वाचा निकाल दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणात छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता केली आहे. भुजबळ यांच्याव्यतिरिक्त तत्कालीन उपविभागीय अभियंता गजानन सावंत, कार्यकारी अभियंता हरीश पाटील, आणि सीए रवींद्र सावंत यांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
या प्रकरणातील इतर काही संशयितांची याआधीच सत्र न्यायालयाकडून सुटका झाली होती. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून छगन भुजबळ यांच्यावर सुरू असलेल्या एका मोठ्या कायदेशीर वादावर पडदा पडला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.