Chhagan Bhujbal, manikrao Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal Vs Manikrao Kokate : जिल्हा बॅंकेवरुन भुजबळ-कोकोटे यांच्यात जरा जास्तच पेटलंय, कोण मागे हटणार?

Chhagan Bhujbal and Manikrao Kokate clash over the financial status of Nashik District Central Cooperative Bank : सुरुवातीला भुजबळांनी माणिकराव कोकाटेंना लक्ष्य केलं. त्यानंतर कोकाटेंनी भुजबळांना प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर भुजबळांनी पुन्हा कोकोटेंना प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे दोघांमधील हा वाद अधिकच पेटला असून कोणीही मागे हटण्यास तयार नाही.

Ganesh Sonawane

Nashik DCC Bank | नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक हजारो कोटींच्या थकीत कर्जामुळे मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. त्यावरुन सध्या नाशिकमधील राजकीय वातावरण तापलं असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मंत्री छगन भुजबळ व मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यात शाब्दिक वॉर सुरु झालं आहे. सुरुवातीला भुजबळांनी माणिकराव कोकाटेंना लक्ष्य केलं. त्यानंतर कोकाटेंनी भुजबळांना प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर भुजबळांनी पुन्हा कोकोटेंना प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे दोघांमधील हा वाद अधिकच पेटला असून कोणीही मागे हटण्यास तयार नाही.

माणिकराव कोकाटे व छगन भुजबळ यांच्यातील राजकीय वैर नाशिक जिल्ह्यात सर्वश्रुत आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळांना सुरुवातीला डावलण्यात आलं होतं. अजित पवार यांनी भुजबळ यांच्या जागी नाशिक जिल्ह्यातून पहिल्यांदा कोकाटे यांना मंत्रिपद दिलं. मात्र भुजबळांनी आपल्या मंत्रिपदाची लढाई प्रतिष्ठेची केली. ओबीसी चेहरा असलेल्या भुजबळांचा प्रभाव पाहुन महायुतीने भुजबळांना मंत्रिमंडाळात घेतलं. तेव्हापासूनच या दोघांमधील हे वाक् युद्ध रंगत आहे. नाशिक मधील राजकारणात वर्चस्व वादाच्या मुद्द्यावरुन दोघांमधील संघर्ष आणखी उफाळेल अशी शक्यताही राजकीय तंज्ञानी व्यक्त केली होती.

सुरुवातीला पालकमंत्री पदावरुन दोघे आमने-सामने येतील अशी शक्यता होती. मात्र पालकमंत्रीपदच रखडलं. पण आता जिल्हा बॅंकेच्या आर्थिक स्थितीवरुन दोघांमध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली आहे. सहकार श्रेत्रात दुसऱ्या क्रमांकावर असलेली नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक सर्वपक्षीय संचालकांनी बुडवल्याचा आरोप भुजबळांनी केला होता. मात्र त्यावर भुजबळांचा गैरसमज झाला आहे, त्यांनी केलेला आरोप चुकीचा आहे. कुठल्याही राजकीय नेत्याकडे बँकेचे कर्ज येणे नाही. असं प्रत्युत्तर कोकाटेंनी दिलं होतं.

काही गोष्टीत चुकीचे निर्णय झाले, अनावश्यक कर्ज वाटप झालेले आहे. हे कर्ज वसुल न झाल्याने बॅंक अडचणीत आली. परंतु यातून राजकीय हेतूने आरोप करणे योग्य नाही. असं कोकाटेंनी भुजबळांना सुनावलं होतं. त्यावर भुजबळांनी पुन्हा कोकाटेंवर पलटवार केला. भुजबळ म्हणाले माझा नेहमीच गैरसमज होत असतो. त्यांचा समज चांगला आहे. जिल्हा बॅंक कुणी व कशी बुडवली हे त्यांनीच आपल्याला सांगावं असं भुजबळांनी म्हटलं आहे.

नाशिक जिल्हा बॅंक एकेकाळी हिंदुस्थानात दुसऱ्या तर महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर होती. शेतकऱ्यांच्या कर्जाच्या बाबतीत आघाडीवर होती याची आठवण भुजबळांनी कोकाटेंना करुन दिली. सर्वपक्षीय सोकॉल्ड नेत्यांनी बँक बुडवली. ज्यांनी बॅंक बुडवली त्यांची पुढील पिढीच आता पुन्हा बॅंकेवर ताबा मिळवण्यासाठी निवडणुक लढण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे बॅंकेची निवडणुक घेऊ नका असं भुजबळ म्हणाले. या मुद्द्यावर मात्र निवडणुका घेऊ नये या मताचा मी सुद्धा आहे असं कोकाटे यांनी म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी बॅंक बुडवली असा आरोप करु नका असंही म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT