Devyani Pharande & Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal Politics: आमदार देवयानी फरांदे, नंतर मंत्री भुजबळ म्हणाले, 'मी स्वतः रस्त्यावर उतरतो', प्रकरण आहे तरी काय?

Chhagan Bhujbal; Minister Chhagan Bhujbal intervened in the intimate issue of Nashik Traffic residents -नाशिक शहरातील द्वारका चौकातील वाहतूक कोंडी नाशिककरांच्या जीवनमरणाचा प्रश्न बनला आहे.

Sampat Devgire

Chhagan Bhujbal News: दोन दिवसांपूर्वी आमदार देवयानी फरांदे या चक्क रस्त्यावर उतरून पोलिसांना समज देत होत्या. शनिवारी मंत्री छगन भुजबळ यांनी त्याची पुनरावृत्ती केली. निमित्ताने पहिल्यांदाच लोकप्रतिनिधी शहराच्या एका दुर्लक्षित मात्र जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सक्रिय झाल्याचे दिसले.

कोणत्याही मार्गाने आलात तरी नाशिक शहरात प्रवेश करायचा असेल तर द्वारका चौकातून पुढे जाणे अटळ आहे. सध्या हा भाग वाहतूक कोंडी आणि नागरिकांना त्रस्त करणाऱ्या समस्यांचा झाला आहे. यावर लोकसभा, विधानसभा यापासून तर रोजच्या व्यवहारातही चर्चा होते. मात्र उपाय काय तो सुचलेला नाही.

या संदर्भात शनिवारी मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या स्टाईलने प्रशासनाला धारेवर धरले. महापालिका अधिकाऱ्यांची यावेळी अक्षरशः भंबेरी उडाली. वाहतूक नियंत्रण आणि कोंडी सोडविण्याचा प्रश्न कोणाचा यावर कोणतीच यंत्रणा जबाबदारी घेताना दिसली नाही. महापालिका आणि वाहतूक पोलीस एकमेकांवर जबाबदारी प्रकलताना दिसले.

त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मी मुंबई महापालिकेचा कारभार हाकलेला आहे. मला शिकवण्याचा प्रयत्न करू नका. उपाययोजना करा अन्यथा मी स्वतः रस्त्यावर उतरतो, अशी निर्वाणीची भाषा मंत्री भुजबळ यांनी वापरली.

मंत्री छगन भुजबळ यांच्यावर अशी भाषा वापरण्याची वेळ यावी, अशी स्थिती वास्तवात होती. दोन दिवसांपूर्वी आमदार देवयानी फरांदे यादेखील या भागातून जाताना चांगल्यात संतप्त झाल्या होत्या. तू कोंडीचा प्रश्न आणि बेशिस्त वाहतुकीने अडलेला रस्ता यावर कोणाचे नियंत्रण आहे की नाही? असं प्रश्न त्यांनाही पडला होता.

यावेळी स्वतः आमदार फरांदे यांनी रस्त्यावर उतरून वाहतूक पोलिसांची चांगलीच हजेरी घेतली होती. त्यांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क करून या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देखील केल्या. आपले काम बाजूला ठेवत त्यांनी द्वारका चौकातील वाहतूक कोंडी किती गंभीर आहे याचा आढावा प्रत्यक्ष फिरून घेतला.

शहराच्या दृष्टीने हा महामार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मिनिटाला शेकडो वाहने आणि बसेस येथून जातात. मात्र अतिक्रमणांमुळे त्याच चौकात बॉटलनेक तयार झाला आहे. याकडे महापालिका दुर्लक्ष करते. वाहतूक पोलिसांच्या डोळ्यासमोर हे सगळे घडत असताना त्यांना त्याचे काहीच सोयरे सुतक नसते. असे बारीक-सारीक तपशील चक्क मंत्री भुजबळ यांनीच प्रशासनाच्या नजरेस आणून दिले.

आमदार देवयानी फरांदे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रश्नात लक्ष घातले. त्याआधी शेकडो वेळा आणि जवळपास रोजच त्याची चर्चा होते. मात्र प्रशासनाला हा प्रश्न नागरिकांच्या जिव्हाळ्याचा वाटला नव्हता. निमित्ताने मंत्री छगन भुजबळ आणि आमदार फरांदे या दोघांनी शहराच्या एका जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घातला. यावरच न थांबता थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांना द्यावा लागला, त्यामुळे हा विषय चर्चेचा बनला आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT