Manikrao Shinde & Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal Won: मंत्री छगन भुजबळ यांची जरांगे फॅक्टरवर मात, २६ हजार मतांनी विजयी!

Chhagan Bhujbal; Minister Chhagan Bhujbal won with 26 thousand votes, Defeat NCP Sharad Pawar Party-राज्यात चर्चेचा विषय असलेल्या येवल्यात मंत्री छगन भुजबळ पाचव्यांदा विजयी, मताधिक्य घटले

Sampat Devgire

Chhagan Bhujbal Won: राष्ट्रवादी काँग्रhttps://www.youtube.com/watch?v=bUcUnsox5d4स अजित पवार पक्षाचे नेते, मंत्री छगन भुजबळ हे येवला मतदारसंघात पाचव्यांदा विजयी झाले. यंदा अनेक राजकीय आव्हाने व विरोध असताना त्यांनी आपला बालेकिल्ला राखला आहे. त्यांना विरोधकांना चितपट केले.

आज झालेल्या मतमोजणीत बावीस फेऱ्यांअखेर सव्वीस हजार ५८ मतांनी विजयी झाले. मंत्री भुजबळ यांना एक लाख एकतीस हजार ९४५ मते मिळाली. त्यांचे विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माणिकराव शिंदे एक लाख पाच हजार ८८७ मते मिळाली.

मंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माणिकराव शिंदे यांच्यात थेट सामना झाला. यामध्ये विविध नेत्यांची विभागणी झाली माजी आमदार मारोतराव पवार, नरेंद्र दराडे, संभाजी पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांनी माणिकराव शिंदे यांना साथ दिली. शिवसेनेचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावरच भुजबळ यांची साथ केली. अंबादास बनकर, मोहन शेलार, जयश्री जगताप यांसह नेते भुजबळ यांच्या समवेत होते.

या निवडणुकीत राजकारण स्पष्टपणे सामाजिक मुद्द्यांवर गेले. त्यात भुजबळ यांच्या विकासाचा मुद्दा चर्चेत राहिला मात्र मराठा ओबीसी मुस्लिम या मतदारांनी घेतलेली भूमिका आणि आक्रमक प्रचार यापुढे विकासाचा मुद्दा मागे पडल्याचे दिसून आले.

मराठा आरक्षणाचे नेते म्हणून जरांगे पाटील यांच्यावर आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात मंत्री भुजबळ यांनी सत्तेत असूनही सातत्याने टीका केली. त्याचे पडसाद या निवडणुकीत अतिशय आक्रमकपणे उमटल्याचे दिसले. त्यात मनोज जरांगे जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या धामधुमीत येवला मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी त्यांनी समाजाला अतिशय भावनिक आवाहन केले. जरांगे पाटील यांच्या या दौऱ्याने येवला विधानसभा मतदारसंघाची निवडणूक वेगळ्या वळणावर गेली. त्याचा त्याचा लाभ माणिकराव शिंदे यांनी उठवला.

येवला मतदार संघाची निवडणूक यंदा बारामती एवढीच प्रतिष्ठेची बनली होती. राज्याचे ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीमुळे हा मतदारसंघ एरवी ही चर्चेत असतो. यंदा भुजबळ पाचव्यांदा उमेदवारी करीत होते. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडाळी मुळे येवला चर्चेत राहिले.

मंत्री छगन भुजबळ यांना राजकारणात आणि येवला मतदारसंघात स्थिरस्थावर करण्यात शरद पवार यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. यंदा मात्र भुजबळ यांनी शरद पवार यांनाच दगा दिला. त्यामुळे शरद पवार यांनी येवला मतदार संघ प्रतिष्ठेचा केला होता. त्यासाठी त्यांनी सहमतीचा उमेदवार देण्याचा देखील यशस्वी प्रयत्न केला.

श्री पवार यांनी येवला मतदारसंघात सभा घेतली. या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी श्री पवार यांनी गद्दार भुजबळ यांना पराभूत करा असे आवाहन केले. या सभेनंतर भुजबळ अन्य सर्व कामे सोडून येवल्यातच मुक्कामाला आले. प्रत्येक गाव पिंजून काढत त्यांनी प्रचार केला.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT