Ajit Pawar and Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : मंत्री केलं आता आणखी एक करा, भुजबळ समर्थकांची अजित पवारांकडे मोठी मागणी

Chhagan Bhujbal supporters urge Ajit Pawar : नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांनी ढोल ताशे वाजवून, फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत भुजबळांना मंत्रिपद मिळाल्याचा जल्लोष केला. याचवेळी अजित पवार याच्यांकडे आणखी एक मागणी केली.

Ganesh Sonawane

Chhagan Bhujbal : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्टवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. छगन भुजबळ यांना या मंत्रिपदासाठी करावा लागलेला संघर्ष काही लपून नाही. सुरुवातीला भुजबळांना मंत्रिपद डावलण्यात आलं होतं, त्यानंतर भुजबळांसह त्यांचे समर्थक नाराज झाले होते. मात्र आता भुजबळांची मंत्रिमंडळात एन्ट्री झाल्याने भुजबळ समर्थकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांनी ढोल ताशे वाजवून, फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत भुजबळांना मंत्रिपद मिळाल्याचा जल्लोष केला. नाशिक येथील भुजबळ फार्म व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई नाका येथील कार्यालयात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले.

दरम्यान, याप्रसंगी कार्यकर्त्यांनी आणखी एक मोठी मागणी अजित पवार यांच्याकडे केली. भुजबळांना मंत्री केलं आता नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री करा अशी मागणी माध्यमांशी बोलताना कार्यकर्त्यांनी केली. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सात आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा पालकमंत्रीपदावरील दावा कायम असून भुजबळ साहेबांना नाशिकचे पालकमंत्री करा अशी विनंती भुजबळ समर्थक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते नानासाहेब महाले, प्रदेश पदाधिकारी गोरख बोडके, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, शहराध्यक्षा कविता कर्डक, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, संजय खैरनार, पूजा आहेर, आशा भंदुरे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

त्यामुळे आता नाशिकमध्ये पालकमंत्रीपदाची स्पर्धा वाढणार आहे. भाजपचे गिरीश महाजन व शिवसेनेचे दादा भुसे याआधीच पालकमंत्रीपदाच्या रेसमध्ये आहेत. त्यात आता दोघांत तिसरा अर्थात छगन भुजबळ यांची एन्ट्री झाली आहे. नाशिकमध्ये 2026-2027 मध्ये कुंभमेळा आहे. भुजबळ साहेबांना देखील कुंभमेळ्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे भुजबळांना पालकमंत्री करा असा सर्वच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा सूर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT