Chhagan Bhujbal Criticizes Nashik Kumbh Mela Preparations : नाशिकमध्ये कुंभमेळा व्हायला हवा, मात्र तो आमच्या लोकांच्या जीवावर उठता कामा नये अशी भूमिका यापूर्वी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केली होती. शहरातील रस्त्यांचे खोदकाम व खड्ड्यांमुळे होणारे अपघात व मृत्यू यावरुन भुजबळांनी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्यासह महापालिका आयुक्त, कुंभमेळा आयुक्त या सगळ्यांनाच खडेबोल सुनावले होते.
आता पुन्हा एकदा भुजबळांनी कुंभमेळ्याची तयारी व होत असलेल्या कामांवर भाष्य केलं असून जोरदार ताशेरे ओढले आहेत. नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले, गेल्या कुंभमेळ्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे आणि ठेकेदारांचे पैसे अजूनही थकलेले आहेत. सरकार कुंभमेळ्यासाठी 38 हजार कोटी रुपये खर्च करणार असेल, तर त्यातून आधी या शेतकऱ्यांचे थकीत पैसे द्यायला हवे. तरच जनता पुढच्या कामांसाठी सहकार्य करेल. कुंभकामांसाठी कुणावरही अन्याय होता कामा नये.
शहरातील खड्ड्यांमुळे नाशिकचे आधीच खराब झाले आहे. मी कुंभमेळ्याची कामे बघितली नाही, पण अधिकारी व यंत्रणने ही कामे वेळेत होतील असे सांगितले होते. कुंभमेळ्यामुळे नाशिकचा विकास होतो याचे आम्ही स्वागत करतो, पण ही तयारी नाशिककरांच्या जीवावर उठता कामा नये. बाहरेच्या लोकांसाठी रेड कार्पेट टाकताना स्थानिक नागरिकांना आपण नष्ट करणार आहोत का? असा सवाल करत स्थानिकांवर अन्याय, हे चालणार नाही, असं भुजबळांनी सुनावलं.
तसेच कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणासाठी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना निमंत्रित करण्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी, राष्ट्रपती येण्यापूर्वी प्रत्यक्ष कामे पूर्ण करा, ते इथे काय अर्धवट कामे बघायला येतील का? असा सवाल करत चिमटा काढला.
कुंभमेळा बैठकांमधील वाद व गोंधळावर तोडगा काढण्यासाठी साधू-संतांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन त्यांचा सल्ला घेतल्यास असे वाद होणार नाहीत असं भुजबळ म्हणाले.
तसेच शहरात बेकायदेशीरपणे ५० झाडे तोडण्यात आल्याच्या प्रकारावर त्यांनी संताप व्यक्त केला. महानगरपालिकेचे काही अधिकारी अशा लोकांना सांभाळतात, म्हणूनच हे माफिया डोक्यावर बसले आहेत. केवळ झाडे कापणाऱ्यांवरच नाही, तर कापायला सांगणाऱ्यांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.