Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal On Raj Thackeray : राज ठाकरे, फुले, शाहू, आंबेडकरांचे नांव का घेत नाही?

Sampat Devgire

Raj Thackeray criticism : छत्रपती शिवाजी महाराज राज्यातील प्रत्येक घटकाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यक्रांती केली, त्यांनी सर्वांना सोबत घेतले. त्यांच्यानंतर फुले, शाहू, आंबेडकर यांनी सामाजिक क्रांतीच फार मोठं काम केलं, मात्र राज ठाकरे यांनी जाणीवपूर्वक शरद पवार यांच्याविषयी विधान केले आहे, अशी टिका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. (Raj Thackeray deliberately spreading misunderstandings about Sharad Pawar)

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कोकणातील आपल्या सभेत शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याबाबत श्री. भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, शरद पवार यांनी नेहेमीच छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) महाराष्ट्राला (Maharashtra) एकसंघ ठेवील असे नाव आहे. ते सर्वांचेच; मात्र आजच्या काळात महाराष्ट्राला एकत्रित ठेवण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार महत्त्वाचे आहेत, अशी भूमिका मांडली आहे.

श्री. भुजबळ म्हणाले की, पवार साहेब म्हणाले की, या महाराष्ट्राला एकत्रित ठेवण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर हे महत्त्वाचे आहे. अगदी प्रबोधनकार ठाकरे यांनी देखील बरचसं काम फुले, शाहू, आंबेडकर यांच्यावर केलं आहे. त्यामुळे त्याचं नाव घेण्यात वावगे काय आहे, शरद पवार हे नेहमी शिवाजी महाराजांबद्दल बोलतात मात्र राज ठाकरे हे फुले, शाहू, आंबेडकरांचे नांव का घेत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

रत्नगिरी येथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याबद्दल वक्तव्य केलं. त्यानंतर आज नाशिकमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचा छगन भुजबळ यांनी चांगलाच समाचार घेतला.

राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना भुजबळ म्हणाले की, शरदचंद्र पवार साहेबांसोबत मी गेल्या ९१ सालापासून आहे. पवार साहेब हे अनेक भाषणांत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतात तसेच त्यांच्या इतिहासाची उजळणी देखील ते करत असतात.

गेल्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी पवार साहेबांची प्रकट मुलाखत घेतली त्यात त्यांनी हा प्रश्न विचारला होता. त्यावेळी पवार साहेबांनी स्पष्ट सांगितले की, महाराष्ट्र म्हटल की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतल जात. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील सर्व घटकांचे आहे.

महाराष्ट्रात असा एकही घटक नाही जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर राज्यात फुले, शाहू, आंबेडकर यांच्यासारखे समाज सुधारक होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वव्यापी होते. त्यांनी सर्व समाजाला बरोबर घेतलं असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, फुले, शाहू, आंबेडकरांनी सामाजिक क्रांतीमध्ये मोठ योगदान दिलं. म्हणून पवार साहेबांनी म्हटल आहे की, संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र ठेवण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार आवश्यक आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घटक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणे फुले, शाहू, आंबेडकर यांना मानतात. दिल्लीत आपले जे ही नेते काम करतात त्यांना दिल्लीत मराठा नेते असे म्हटले जाते. अगदी तो नेता कुठल्याही समाजाचा असला तरी अस उत्तर पवार साहेबांनी राज ठाकरे यांना दिल असल्याची आठवण त्यांनी राज ठाकरे यांना करून दिली.

ते पुढे म्हणाले की, प्रबोधनकार ठाकरे यांनी देखील फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार समाजापर्यंत पुस्तकाच्या माध्यमातून मांडले. ही पुस्तके माझ्या संग्रही आहे ती पुस्तके मी वाचतो. त्यामुळे राज ठाकरे यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत फुले, शाहू आंबेडकर यांचे नाव घेतले तर त्यात बिघडत कुठे अशी टिपणी देखील छगन भुजबळ यांनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT