Chhagan Bhujbal & Dilip Khaire
Chhagan Bhujbal & Dilip Khaire Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

छगन भुजबळांनी समता परिषदेचे पत्ते पिसले!

Sampat Devgire

नाशिक : अखिल भारतीय महात्मा फुले समता (Samata Parishad) परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी संघटनेच्या फेरबदल केले आहेत. संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांचे विश्वासू सहकारी दिलीप खैरे (Dilip Khaire) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

परिषदेच्या पदाधिकाऱ्यांत फेरबदल करण्यात आले. त्यात प्रदेश उपाध्यक्ष पदावर श्री खैरे यांसह बाळासाहेब कर्डक, अंबादास गारूडकर, अॅड. सुभाष राऊत, तुकाराम बिडकर यांच्यासह प्रा. दिवाकर गमे यांची वर्णी लावण्यात आली आहे.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची नुकतीच राज्यस्तरीय आढावा बैठक मुंबई येथे पार पडली. सदर बैठकीत कार्यकारिणीबाबत चर्चा होऊन फेरबदल करण्याच्या सूचना राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिल्या होत्या. त्यानुसार माजी खासदार समीर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या कार्यकारिणीत मोठे फेरबदल करण्यात आले आहे.

नवीन बदलानुसार प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे यांच्याकडे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे नंदुरबार, बाळासाहेब कर्डक यांच्याकडे कोकण विभागातील ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अंबादास गारूडकर यांच्याकडे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर, अॅड. सुभाष राऊत यांच्याकडे मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, तुकाराम बिडकर यांच्याकडे विदर्भ विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा तर प्रदेश उपाध्यक्ष प्रा. दिवाकर गमे यांच्याकडे नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

जिल्हाध्यक्षपदी डॉ. योगेश गोसावी

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नाशिक पूर्व जिल्हाध्यक्षपदी डॉ. योगेश गोसावी, तर पश्‍चिम जिल्हाध्यक्षपदी प्रा. ज्ञानेश्‍वर दराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या वेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना ना. भुजबळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT