Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

छगन भुजबळ म्हणतात, `मी चित्रपटांतून खुप काही शिकलो`

Sampat Devgire

येवला : चित्रपटगृहांच्या उद्‌घाटनाला हल्ली हिरो- हिरॉईनला बोलविले जाते. मात्र, आपण एका कलाकारालाच बोलविल्याचे माजी आमदार मारोतराव पवार (Marotrao Pawar) ज्येष्ठनेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना उद्देशून म्हणताच भुजबळांनी स्मितहास्य केले. पण, यावर गप्प बसतील ते भुजबळ कसले..! त्यांनीही मारोतरावांच्या भाषणाचा संदर्भ देत आपण तरुणपणात अनेक चित्रपट पाहिले अन्‌ चित्रपटातून भरपूर काही शिकलेही आहात अशी गुगली टाकली. आजी- माजी आमदारांच्या या राजकीय टोलेबाजीने येथील चित्रपटगृहाचा उद्‌घाटन सोहळा मात्र चांगलाच रंगला! (Chhagan Bhujbal & Maraotrao both leaders present for Theatre inuagration)

शहरातील लक्ष्मी सिनेप्लेक्स या चित्रपट गृहाचे भुजबळ यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी माजी आमदार मारोतराव पवार, सहकार नेते अंबादास बनकर, राधाकिसन सोनवणे, हुसेन शेख, सिनेप्लेक्सचे विकर्णसिंग परदेशी, डॉ. दिनेश परदेशी, विक्रमसिंह परदेशी, दीपकसिंह परदेशी आदी उपस्थित होते.

पूर्वीचा येवला आणि आत्ताचा येवला यात मोठा फरक आहे. या शहराचा आपण विविधांगी विकास केल्याने याठिकाणी नवनवीन वास्तू, उद्योग येत असल्याचा आनंद होत असल्याचे मत या वेळी भुजबळ यांनी व्यक्त केले. सगळ्या महाराष्ट्रात दिसणारे मल्टिप्लेक्स हे महाराष्ट्रात मी स्वतः घेऊन आलो. पर्यटनमंत्री असताना गुजरातमध्ये असे मल्टिप्लेक्स सुरू झाले होते. मात्र, महाराष्ट्रात तसे मल्टीप्लेक्स नव्हते.

त्यानंतर महाराष्ट्रात आम्ही एक योजना आखून मल्टिप्लेक्स घेऊन आलो. सुरवातीच्या अनेक मल्टिप्लेक्स चित्रपटगृहाचे उदघाटन आम्ही केले असल्याचे भुजबळांनी सांगितले. मनोरंजनाची माध्यमे आता बदलली आहेत. मोबाईल आणि टीव्हीवर देखील चित्रपट येऊ लागली आहेत. ही आव्हाने पेलत चित्रपटगृह मालकांनी या स्पर्धेत राहिले पाहिजे. सर्व सुविधांयुक्त असलेले अद्यावत चित्रपटगृह येवला नगरीत झाल्याने विकासात मोठी भर पडल्याचेही भुजबळ म्हणाले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT