Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

छगन भुजबळ म्हणाले, `शेतकऱ्यांना दिवसाच वीज द्या`

नाशिक येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली.

Sampat Devgire

येवला : वीज वितरण कंपनीकडून (MSEDC) येवल्यात (Nashik) चार दिवस रात्री व तीन दिवस दिवसा वीजपुरवठा केला जातो. यामध्ये बदल करून ज्या गावांना रात्री वीजपुरवठा होत आहे, त्यांना दिवसाची वीज देण्यात यावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली असता या वेळापत्रकात बदल करण्याचे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.

येवला मतदारसंघातील विजेच्या प्रश्नांबाबत निरीक्षक दिलीप खैरे यांनी नुकतीच बैठक घेतली होती. यामध्ये विजेच्या प्रश्नांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर पालकमंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत मतदारसंघातील वीज प्रश्नावर आढावा बैठक झाली. मतदारसंघातील विजेच्या प्रश्नांबाबत चर्चा करत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. प्रदेश निरीक्षक दिलीप खैरे, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, बाजार समितीचे मुख्य प्रशासक वसंत पवार, स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, पांडुरंग राऊत, मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता सानप, कार्यकारी अभियंता सतीश बोंडे, संजय तडवी, श्री. तपासे, डी. के. आहेर, श्री. आव्हाड, गजानन ठोंबरे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

सहकार्याची भावना ठेवा

कोरोनामुळे शेतकरी देखील अडचणीत असून विजेबाबत निर्णय घेताना अधिकाऱ्यांनी सहकार्याची भावना ठेवावी. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. देखभाल दुरुस्तीसह पायाभूत सुविधांची कामे तातडीने पूर्ण करावे, मतदारसंघातील फिडरसह, ट्रान्सफार्मरची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासोबत आठ दिवसांच्या आत ३८ गावे पाणी पुरवठा योजनेच्या सौर प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात यावे. अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून अडचणी तात्काळ दूर कराव्यात. जुन्या लाईन्स आणि जुने विद्युत पोल दुरुस्त करणे, फेल ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना अनेक दिवस वाट बघावी लागू नये अशा सूचना श्री. भुजबळ यांनी केल्या

दुरूस्तीबाबत विशेष सूचना

तालुक्यातील ट्रान्सफॉर्मर लवकर दुरुस्त करून मिळावे यासोबतच १३२ के.व्ही पाटोदा (पिंप्री ) उपकेंद्राचा महापारेषणला पाठवलेला प्रस्ताव, नगरसूल उपकेंद्रामध्ये ५ एमव्हीएचे अतिरिक्त रोहित्र बसवणे, अंगुलगाव, वडगाव बल्हे, सोमठाणदेश, जऊळके ३३ केव्ही ए, पिंपळगाव जलाल नवीन विद्युत उपकेंद्र सुरू करणे, येवला येथे १० एमव्हीएचे रोहित्र बसवणे, अंदरसूल येथील उपकेंद्रात करावयाच्या कामासंदर्भात कार्यारंभ आदेश, एसीएफ योजनेतील शेतकऱ्यांचे ६३ क्षमतेचे ओव्हरलोड झाले, त्या ठिकाणी १०० चे ट्रान्सफॉर्मर देण्यात यावे, सर्व उपकेंद्रांमध्ये महावितरण कंपनीच्या फंडातून कॅपॅसिटर बॅंक बसविण्याच्या सूचना केल्या. मरळगोई, खडक माळेगाव उपकेंद्र सुरू करणे,खानगाव विद्युत उपकेंद्रात अतिरिक्त रोहित्र बसवणे,मानोरी येथील फिडर वेगळे करणे,महावितरण कार्यालय इमारती,अधिकारी कर्मचारी निवासस्थाने ही कामे मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT