Chhagan Bhujbal & Manoj Jarange Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation News : मी गुंड, बंदुका घेऊन फिरणारा नाही; भुजबळांचा जरांगेंवर पलटवार

Chhagan Bhujbal says, whatever i says, is all leaders policy-कुणबी दाखला घेऊन ‘ओबीसी’मध्ये बॅक डोअर एंट्री घेणाऱ्यांना आमचा विरोध असल्याचा भुजबळांचा पुनरूच्चार

Sampat Devgire

Chhagan Bhujbal Vs Jarange Patil : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधाचा सूर कायम ठेवत, कुणबी जातीचा दाखला घेऊन ओबीसी वर्गात बॅक डोअर एन्ट्रीला विरोध असल्याचे सांगितले. (Chhagan Bhujbal oppose back door entry in OBC category)

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्यांतील वक्तव्यांना विरोध करीत, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी त्यांच्यावर टिका केली. त्यांनी ओबीसी (OBC) वर्गाच्या आरक्षणात कोणालाही बॅकडोअर एंट्री देऊ नये याचा पुनरूच्चार केला.

श्री. भुजबळ म्हणाले, जरांगे पाटील रोज बोलत असतात. मी मात्र तसे करीत नाही. मी १५ दिवसांतून एक बोलतो. मी काही जाळपोळ करीत नाही. बंदूक आणि गुंडांना घेऊन फिरत नाही, अशी टिका मराठा आंदोलनासाठी लढा उभारणारे जरांगे पाटील यांच्यावर केली.

ते म्हणाले, लोकशाही मार्गाने माझा लढा सुरू आहे. त्यात मला जे अधिकार मिळाले आहेत, त्यानुसार मी माझी भूमिका मांडत आहे. मराठा आरक्षणाविषयी राज्यातील सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांचे देखील ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण दिले पाहिजे या भूमिकेवर एकमत आहे.

ते पुढे म्हणाले, ओबीसी वर्गामध्ये सध्या जी काही बॅकडोअर एन्ट्री होत आहे, त्याला मात्र आमचा प्रखर विरोध आहे, बॅकडोअर एन्ट्री मिळेल, ती आम्ही न्यायालयात जाऊन रद्द करू. आमची भूमिका काय असेल, ती ओबीसी नेते ठरवतील. जरांगे पाचील हे काही महाराष्ट्राचे नेते नाहीत. मराठा समाजाला आरक्षण द्यावे मात्र ते वेगळे द्यावे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT