Hemant Godse & Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal Politics: श्रेयवाद इलेक्ट्रीक टेस्टींग लॅबचा; खासदार हेमंत गोडसेंनी सुनावले, छगन भुजबळ यांनी न केलेल्या कामांचेही श्रेय घेऊ नये!

नाशिकच्या इलेक्ट्रीक टेस्टींग लॅबवरून सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांतच रंगला वाद, खासदार गोडसे यांनी केला छगन भुजबळ यांचा निषेध

Sampat Devgire

Bhujbal V/s Godse News: नाशिकला बुधवारी इलेक्ट्रीक टेस्टींग लॅबचे लोकार्पण केंद्रीय उर्जामंत्री मनोहरलाल खट्टर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. या कार्यक्रमाचे श्रेय राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी घेण्याचा प्रयत्न केल्याने त्यावरून सत्ताधारी महाविकास आघाडीत धुसफूस रंगली.

केंद्र शासनाच्या ‘सीपीआरआय’ विभागाने या प्रयोगशाळेची उभारणी केली. मात्र एक तप त्यासाठीची प्रक्रीया सुरू होती. या कालावधीत काही काळ समीर भुजबळ तर दहा वर्षे हेमंत गोडसे खासदार होते. प्रयोगशाळा उभारण्याची घोषणा समीर भुजबळ यांच्या कारकिर्दीत २०१३ मध्ये झाली आणि केंद्रात सत्तांतर झाले.

यासंदर्भात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी २०१२ मध्ये शहरातील औद्योगिक प्रदर्शनातून इलेक्ट्रीक प्रयोगशाळेची संकल्पना पुढे आली. नाशिकला निर्माण होने इलेक्ट्रीक उत्पादने तपासणीसाठी दुसऱ्या राज्यात जात होती. समीर भुजबळ खासदार असताना त्यांनी हा प्रकल्प व त्यासाठी जागा मिळवली, असे सांगितले.

बुधवारी झालेल्या कार्यक्रमावर मंत्री असल्याने अर्थातच छगन भुजबळ यांच्या हाती सर्व सुत्रे होती. त्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे खासदार हेमंत गोडसे यांनाच काय अन्य आमदार, खासदारांचीही फारसी उठबस झाली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या माजी खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्या संतापाला जागा करून दिली.

यासंदर्भात माजी खासदार हेमंत गोडसे यांनी संबंधीत प्रयोगशाळेच्या उभारणीच्या प्रक्रीयेत आपला मोठा सहभाग आहे. संबंधीत प्रयोगशाळाअन्यत्र स्थलांतरीत करण्याचा केंद्रीय उर्जा विभागाकडे प्रस्ताव होता. त्याबाबत प्रयत्न करून प्रयोगशाळा नाशिकलाच व्हावी यासाठी खूप पाठपुरावा करावा लागला, तो मी केला.

शीलापूर गावाची गायरान जमीन या प्रयोगशाळेला विनामूल्य मिळावी यासाठी आपण पाठपुरावा केला. ग्रामस्थांच्या सहकार्याने शंभर एकर जमीन मिळवली. २०१५ मध्ये मंत्रीमंडळात ठराव होऊन ही जागा उपलब्ध झाली. मग छगन भुजबळ यांनी २०१३ मध्ये कोणती जमीन उपलब्ध केली? हे समजत नाही.

यानिमित्ताने महायुतीचे घटक असलेल्या मंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना शिंदे पक्षाचे माजी खासदार यांच्यात श्रेयवादाची लढाई रंगली. खासदार गोडसे याबाबत आक्रमक असून आपल्या कामाचे श्रेय इतरांनी घेतल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. मंत्री छगन भुजबळ नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक कामाचे श्रेय घेतात, हे निषेधार्ह असल्याची टिका त्यांनी केली.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT