Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal; शिवसेनाप्रमुखांचे तैलचित्र नवीन संसद भवनात लावा!

Sampat Devgire

नाशिक : (Nashik) हिंदूह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackrey) यांचे तैलचित्र नवीन संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये (New Delhi) लावण्यात यावे यासाठी राज्य शासनाने (Maharashtra Government) केंद्र शासनाकडे (Centre) मागणी करून त्याचा पाठपुरावा करावा अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली आहे. (Chahagn Bhujbal wrote a letter to CM & Dy. CM)

याबाबत छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. नवीन संसद भवनातून लवकरच कामकाज सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे पत्र लिहिले आहे.

छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्राची अस्मिता असलेले शिवसेनाप्रमुख आणि प्रसिध्द संपादक, व्यंगचित्रकार, लेखक, सामना वृत्तपत्राचे संस्थापक तसेच एक प्रखर हिंदुत्ववादी व्यक्तिमत्त्व अशी बाळासाहेब ठाकरे यांची ओळख अखंड हिंदुस्थानाला आहे.

मराठी माती आणि मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. जगाच्या पाठीवर असे काही प्रभावी नेते होऊन गेले त्यात स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. महाराष्ट्राच्या जडणघडणामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे थोर महापुरूष बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र नवीन संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये लावण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे संसद भवनामध्ये येणाऱ्या सन्माननीय लोकप्रतिनिधींना सदैव प्रेरणा आणि स्फूर्ती मिळेल असे त्यांनी म्हटले आहे.

थोर महापुरूष हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र नवीन संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये लावण्याबाबत केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येऊन त्याचा पाठपुरावा करावा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT