Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje Chhatrapati  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sambhajiraje Chhatrapati : 'आता बस्स झालं..' म्हणत संभाजीराजेंनी दंड थोपटले ; महाराष्ट्रात राजकीय गणितं बदलणार..

सरकारनामा ब्युरो

Sambhajiraje Chhatrapati : माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati ) यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात काल (शनिवारी) नाशिक येथे साजरा करण्यात आला. पन्नास वर्षात पहिल्यांदाच संभाजीराजेंचा वाढदिवस हा कोल्हापूरच्या बाहेर साजरा करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचे विचार पोहोचवण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी १२ मे २०२२ रोजी ही संघटना स्थापन केली.

"ही स्वराज्य संघटना उद्या राजकीय पक्ष झाला तरी वावगे ठरु नये. त्याला माझी तयारी आहे. पण पहिला टप्प्यात संघटीत होणे गरजेचे आहे,"असे तेव्हा संभाजीराजे म्हणाले होते. आता ते सक्रीय राजकारणात उतरत आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत ते कुणाही युती करतात, की स्वतंत्रपणे लढतात, हे लवकरच समजेल.

पन्नास वर्षांनंतर पहिल्यांदा संभाजीराजे यांचा अभिष्टचिंतन सोहळा कोल्हापूर बाहेर झाला. यावेळी संभाजीराजे यांनी संघटनेची पुढील भूमिका स्पष्ट केली.वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये संभाजीराजे यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आलं होतं.

आता निर्णय घ्यावा लागेल..

नागरी सत्कारापूर्वी समर्थकांकडून संभाजीराजेंचा महाराष्ट्राच्या हृदयातील मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करत फलकबाजी करण्यात आली. यावेळी संभाजीराजेंनी आपली राजकीय भूमिका जाहीर केली आहे. "मी चळवळीत काम करुन थकलोय, आता निर्णय घ्यावा लागेल", असे म्हणतसंभाजीराजे छत्रपती यांनी 2024 च्या निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय गणिते बदलणार, अशी शक्यता रजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

सस्पेन्स वाढला ..

"चळवळीत काम करून थकलो आहे. त्यामुळे आता बस्स झालं म्हणत स्वराज्य संघटना शंभर टक्के राजकारणात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय स्वराज्य संघटना 2024 ची निवडणूक लढणार असून सत्तेत सुद्धा असेल असंही जाहीर केलं आहे. पण, कोणत्या पक्षात सोबत सत्तेत असणार याचा मात्र स्पष्ट उल्लेख त्यांनी केला नाही. यामुळे सस्पेन्स वाढला आहे.

101 टक्के राजकारणात..

स्वराज्य 101 टक्के राजकारणात आल्याशिवाय राहणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली. 2024 हे निश्चित ध्येय असणार आहे. आमचा तुम्हाला विरोध नाही, पण स्वराज्य सुद्धा असणार हे निश्चित. शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी कामाला लागू. माझ्यासाठी नाही पण गरिबांना ताकद देण्यासाठी आता स्वराज्य येणार आहे, असे ते म्हणाले

काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती..

मला मिळालेलं प्रेम कोणत्याही नेत्याला मिळणार नाही. स्वराज्य संघटना स्थापन केली. मात्र, किती दिवस चळवळीत काम करायचं? कार्यकर्त्यांवर अनेक खटले आहेत ते कोण सोडवणार? 2013 साली सगळे एकत्र आले. मागण्या मान्य झाल्या.

2000 विद्यार्थ्यांची चूक नसताना त्यांना बाद केलं. त्यासाठी मी आमरण उपोषण केलं. किती दिवस स्वराज्य संघटना चालवायची. ज्याच्याकडे पैसे तोच आमदार खासदार होणार का? लोक म्हणतात की तुम्ही सत्तेत या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT