Art Teacher devidas Wani & Shivaji Maharaj`s smallest picture
Art Teacher devidas Wani & Shivaji Maharaj`s smallest picture Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhatrapati Shivaji Maharaj; महाराजांच्या सर्वात लहान पोर्ट्रेट रांगोळीचा विश्वविक्रम!

Sampat Devgire

हर्षल गांगुर्डे

चांदवड : (Nashik) छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंती आज भारतासह अनेक देशांत मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखं, अविश्वसनीय अभिवादन केले आहे ते चांदवड (जि.नाशिक) येथील कलाशिक्षक देविदास हिरे यांनी. अवघ्या अडीच बाय अडीच सेंटिमीटरवर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पोट्रेट रांगोळी काढत एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. (World record of Shivaji Maharaj`s smallest picture)

ही रांगोळी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील सर्वात लहान आकारातील लहान पोर्टेट रांगोळी असल्याचा दावा केला जात असून यामुळे कलेची तपश्चर्या सिद्ध करणारा हा नवा विक्रम ठरला आहे.

श्री. हिरे हे शिक्षण मंडळ भगूर, संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव (ता. चांदवड जि. नाशिक) शाळेत कलाशिक्षक असून आपल्या कलेच्या माध्यमातून सर्वत्र प्रसिद्ध आहे. शिवजयंती निमित्त महाराजांना काहीतरी वेगळ्या पद्धतीने अभिवादन करावे या प्रेरणेने (२.५ सें. मी × २.५ सें. मी.) आकारात ड्रॉइंग पेपर वर हातांच्या बोटांच्या साहाय्याने ५७ मिनिटात ही अनोखी शिवरायांची प्रतिमा रंगोळीमध्ये साकारली आहे.

इतक्या लहान आकारात छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी साकारणारे श्री. हिरे हे पहिले कलाकार आहेत. विविध पुरस्काराने सन्मानित देव हिरे या नावाने प्रसिद्ध असलेले नेहमीच विविध विषयांवर आपल्या फलक रेखाटन, रांगोळी, चित्र, स्केच या कलेतून विविध प्रयोग करत असतात. या रेकॉर्ड ब्रेक ,अद्भुत सर्वात लहान पोर्ट्रेट रांगोळी ने त्यांच्या प्रयोगात अजून एक भर घातली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT