Guardian Minister Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Surgana Issue; दादा भुसे संतापल्यावर `राष्ट्रवादी` नेत्यांनी घेतली माघार!

मंत्रीम्हणाले, जे ७५ वर्षांमध्ये झाले नाही ते ७५ तासांत झाले पाहिजे का?’

Sampat Devgire

नाशिक : सुरगाण्याच्या (Surgana) सीमावर्ती भागातील समस्यांवर नाशिकच्या (Nashik) जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या उपस्थितीत बैठक झाली. मात्र दोन तास चर्चा होऊनही आंदोलक माघार घेण्यास तयार न झाल्याने पालकमंत्री आंदोलकांवर चागंलेच संतापले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) लेटरहेड दाखवत तुम्हाला राजकारण करायचे आहे का? असा प्रश्न केल्यावर आंदोलन स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली. (NCP leader Chintaman Gavit adjourned Gujrat merger agitation today)

आज झालेल्या बैठकीतील चर्चेत आंदोलकांच्या मागण्या मांडताना गोंधळ पाहायला मिळाला. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र तरीही सीमावर्ती गावांतील ग्रामस्थ आंदोलन मागे घेण्यास तयार नसल्याने गोंधळ झाला.

पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवार आणि तालुका अध्यक्ष चिंतामण गावित यांना संतप्त होत सुनावले. ‘दोन तास चर्चा झाली. त्यानंतर देखील ही स्थिती असेल तर हे बरोबर नाही’ या शब्दात भुसे यांनी नाराजी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे लेटर हेड दाखवत भुसे यांनी हे मला दाखवायचे नव्हते कारण माझ्या दृष्टीने गोरगरीबांचे प्रश्न व अडचणी महत्त्वाच्या आहेत. ते प्रश्न सोडवायचे आहेत, असे स्पष्ट केले.

चिंतामण गावित राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष असल्याचं दादा भुसे यांनी पत्र दाखवलं. मात्र राष्ट्रवादी पक्षाचा याच्याशी काही संबंध नाही असं स्पष्टीकरण गावित यांनी दिलं. या मागणीला पक्षाचा पाठींबा असल्याच्या प्रश्नावर गावित यांनी नकार दिला. दरम्यान राष्ट्रवादी पक्षाचे लेटर हेड दाखवत ‘हे बरोबर नाही, दोन तासांपासून सुरु असलेल्या बैठकीत मी हे समोर आणले नाही. मी पक्षांचा विषय चर्चेत आणले नाही. राजकारणाच्या पलीकडे त्या गोरगरीब आदिवासी बांधवांचे दुख आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. जे ७५ वर्षांमध्ये झाले नाही ते ७५ तासांत, ७५ मिनिटांत झाले पाहिजे का?’ असा प्रश्न केला.

यावेळी पालकमंत्री भुसे आक्रमक झाले होते. श्री. भुसे आक्रमक होताच गावितांसह शिष्टमंडळातील प्रतिनिधी नरमले. शिष्टमंडळाच्या दबावानंतर गावित यांनी आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली आहे.

सुरगाण्याच्या सीमावर्ती भागातील समस्यांवरील बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली. यावेळी आंदोलनाला राजकीय वळण तर लागले नाही असा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे पत्रकार परिषदेत गोंधळ झाला. शेवटी आंदोलनासाठी स्थापन केलेल्या शिष्टमंडळाच्या दबावामुळे गावित यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.

महाराष्ट्रातच राहायचे आहे

पत्रकार परिषद झाल्यानंतरही या ठिकाणी एक ट्विस्ट पाहायला मिळाला. ५५ गाव गुजरातमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी करत असताना यातीलच काही गावकऱ्यांनी मात्र ‘आम्हाला महाराष्ट्रातच राहायचे आहे’ असे निवेदन पालकमंत्र्यांना दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT