Devendra Fadnavis vs Eknath Shinde political rivalry in Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devendra Fadnavis Politics: देवा भाऊ अन् शिंदेंची परस्परविरूद्ध जोरदार बॅटिंग! कोण आऊट कोण विन? निर्णय थर्ड अंपायर नाशिककरांकडे!

Nashik voters reaction to Fadnavis and Shinde: नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Sampat Devgire

Nashik Election 2025: नगरपालिका निवडणुकीचे वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच दिवशी नाशिकला होते. दोघांनीही आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर येथे पूजन करून भाजप प्रचाराचा प्रारंभ केला. ज्याला आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचा संदर्भ होता. मुख्यमंत्र्यांनी भाजपसाठी आक्रमक प्रचाराचे धोरण असल्याचे संकेत दिले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सटाणा, मनमाड येथे प्रचार सभा घेतली. आमदार सुहास कांदे यांनी घेतलेल्या या सभेला वेगळे राजकीय संदर्भ होते. उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या सभेत एकच वेळी नाव न घेता महायुतीच्या नेत्यांनाच आव्हान दिले. त्यामुळे या सभा चर्चेचा विषय ठरल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने त्रंबकेश्वरमध्ये मोठा बंदोबस्त होता. कुशावर्त कुंडाचा परिसर, कुंभमेळा शाही मिरवणूक मार्ग आणि अन्यत्र प्रशासनाने साफसफाई केली. त्यामुळे हा परिसर चकाचक झाला होता. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने हा बदल घडला. त्यामुळे नागरिकांनी देवा भाऊंनी रोजच त्र्यंबकेश्वरला यावे अशी सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली.

महायुतीच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे दोघांनीही प्रचार दौरा केला. या निमित्ताने शिंदे यांनी काहीसे व्यक्तिगत स्वरूपाचे विधाने केली. मंत्र्यांनी मात्र नगरपालिका निवडणुकीत उमेदवारांसाठी भाजपचे आक्रमक धोरण असल्याचे संकेत दिले.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा प्रचार दौरा होता. यातून कुंभमेळ्याच्या माध्यमातून वेगळा संदेश राज्यभरातील नगरपालिकांसाठी त्यांनी दिला. यावेळी शासनाकडून राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती देण्यापेक्षा राजकारणाला त्यांनी महत्त्व दिले.

नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज्य शासन नवे धोरण आखणार आहे. राम शहरांनाही विकासाची संधी मिळाली पाहिजे. छोट्या शहरांचा विकास व त्यासाठी निधीची कमतरता जाणवणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे यांसह विविध नेत्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत भाजपने सर्व प्रभागांमध्ये उमेदवार दिले आहेत. येथे भाजपला महायुतीच्या सहकारी पक्षांनीच आव्हान दिले आहे.

विरोधी महाविकास आघाडी फारशी चर्चेत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या देहबोलीवरून तरी त्र्यंबकेश्वर नगरपालिका भाजपला सोपी असल्याचा संदेश देण्यात भाजप यशस्वी झाला. या प्रचाराचा पारंभ मुख्यमंत्र्यांनी नाशिकमधून केला हे विशेष.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT