Eknath Khadse, Eknath Shinde Latest News
Eknath Khadse, Eknath Shinde Latest News sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

'आधीचे एकनाथ तुमच्या मागे लागले, पण तुमचा एकनाथ पुढे घेऊन जाणारा'

सरकारनामा ब्यूरो

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जळगावातील आपल्या सभेत शिवसेनेवर तुफान हल्लाबोल केला. याबरोबरच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंवर (Eknath Khadse) देखील टीका केली.

आधीचे एकनाथ तुमच्या मागे लागले होते. पण हा एकनाथ तुमचा हात हातात घेऊन तुम्हाला पुढे घेऊन जाणारा आहे,अशा शब्दात त्यांनी खडसेंवर टीका केली.

मुख्यमंत्री आज (ता.२० सप्टेंबर) जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी मुक्ताईनगर येथे त्यांची सभा झाली. या सभेत त्यांनी चौफेर फटकेबाजी केली. (Eknath Khadse, Eknath Shinde Latest News)

शिंदे म्हणाले, आम्हाला आता ट्वेन्टी-ट्वेन्टी खेळायची असून कमी वेळात खूप काम करायचं आहे. चंद्रकांतने सलग ९ वेळा आमदारकी असणाऱ्या घराण्याला पराभूत केलं. एक घराणे सोडलं तर सर्व मतदारसंघ चंद्रकांतच्या पाठीशी आहे. आधीचे एकनाथ तुमच्या मागे लागले होते. पण हा एकनाथ तुमचा हात हातात घेऊन तुम्हाला पुढे घेऊन जाणारा आहे, अशी टीका शिंदेंनी खडसेंवर केली.

ज्या वेळी आम्ही हा निर्णय घेतला. तेव्हा मोठं धाडस केलं. सरकारमध्ये आपले मुख्यमंत्री असतानाही चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर खोट्या केसेस दाखल केल्या गेल्या. मुख्यमंत्री आपला असतानाही देखील आपल्यावर हे दिवस होते. शिवसेनेचा र्हास सुरू होता. सरकार कोण चालवत होत, हे सर्वांना माहित आहे, अशा शब्दात शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला.

पुढे शिंदे म्हणाले की, आम्ही आमचं सरकार स्थापन केलं नसतं तर पुढील अडीच वर्षात काय झालं असत महित नाही. मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे. मात्र मी ते शेतकऱ्यांना न्याय देण्याचं, राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचं कंत्राट घेतल आहे. दाऊदने मुंबईत बॉम्ब स्फोट केले, त्याच्याशी संबंध आढळलेल्या सरकारमधील मंत्र्यावर तुम्हाला कारवाई करता आली नाही. दाऊदचा हस्तक होण्यापेक्षा मोदींचा होणे चागलं. आम्ही मोदींसोबत गेलो, तर तुमच्या पोटात का दुखतंय. वेदांता प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, जनतेसमोर सर्व सत्य समोर येईल. दूध का दूध पाणी का पाणी झालच पाहिजे. गेल्या अडीच वर्षात किती कंपन्या त्रासामुळे बाहेर गेल्या, चाकणमध्ये किती हॅरेसमेंट झाली, याची यादी माझ्याकडे आहे. मात्र ते योग्य वेळी बोलणार. अजितदादा मुक्ताईनगरला येवून गेले, त्यांचा पायगुण बघा, ५ आमदार आमच्या बाजूने उभे राहिले, असा टोला देखील त्यांनी पवारांना लगावला.

दरम्यान, शिंदेंनी जळगावात शिवसेनेबरोबरच एकनाथ खडसे आणि अजित पवारांनाही लक्ष केल्याने आता यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येणार हे बघावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT