Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde: मी राज्यपालांच्या विधानाशी सहमत नाही!

Sampat Devgire

मालेगाव : मुंबईतील (Mumbai) गुजराथी व राजस्थानी नागरिक निघून गेले तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी (Financial capital) राहणार नाही, या राज्यपालांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले. ते त्यांचे वैयक्तीक वक्तव्य असल्याचे सांगत आम्ही बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakrey) यांनी मुंबईबाबत आजवर जी भूमिका मांडली त्या भूमिकेशी बांधील आहोत, असेही त्यांनी सांगितले. (CM Eknath Shinde criticised Governer`s controversial statement)

मुख्यमंत्री आपल्या दारी योजनातंर्गत आज राज्याचा दौरा करताना त्यांनी मालेगावला पहिली भेट दिली. यावेळी त्यांनी सकाळी नऊला विविध विभागांची आढावा बैठक घेतली. त्या शेतकरी समस्या, पूरग्रस्त परिसर, वीजेचे प्रश्न, नादुरस्त रस्ते यांसह विविध विषयांबाबत संबंधीतांना सूचना केल्या. रस्ते चांगल्या दर्जाचे असावेत. त्यात गुणवत्तेत काहीही तडजोड होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबई बाबत नुकत्याच केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत वाद टाळण्याचा प्रयत्न त्यांनी केला. याबाबत वारंवार विचारल्यावर ते म्हणाले, राज्यपालांनी देखील याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ते त्यांचे वैयक्तीक मत आहे. त्याबाबत आम्ही त्याच्याशी सहमत नाही. उपमुख्यमंत्री तसेच भाजपने देखील याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. या विषयावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका परखड आहे. तीच आमची भूमिका आहे. मुंबईसाठी १०६ हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले आहे. मुंबईच्या उभारणीत मराठी माणसाचे योगदान व त्याग आहे, त्यामुळे तीचा विकास झाला आहे. येथे सगळ्यांचे स्वागत केले जाते. मात्र मराठी माणसाचा कोणीही अवमान करू नये. तसे केल्यास आम्ही सहन करण्याचा प्रश्नच नाही.

राज्यपाल हे महत्त्वाचे व मोठे पद आहे. त्या पदावरील व्यक्तींनी सार्वजनित वक्तव्य करताना काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे आम्ही वेगळे काही सांगण्याची काही गरज नाही. मराठी माणूस आणि मुंबई वेगळे करता येणार नाही.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT