Dr Vijaykumar Gavit & J P Gavit Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Tribals Agitation : आदिवासी आंदोलन पुन्हा पेटणार? आता मंत्री विजयकुमार गावित यांच्या मतदारसंघात मेळावा!

CM Eknath Shinde Politics The promise given to the tribals is unfulfilled and now Nandurbar is protesting : गेले दोन महिने पेसा कायद्याअंतर्गत आदिवासी उमेदवारांच्या नियुक्तींचा प्रश्न चिघळला आहे.

Sampat Devgire

Gavit Vs Gavit News: पेसा कायद्यांतर्गत राज्यातील तेरा जिल्ह्यांमध्ये आदिवासी उमेदवारांच्या नियुक्ती रोखली आहे. या विरुद्ध आदिवासी समाजामध्ये तीव्र संतापाची भावना आहे. या विरोधात राज्य सरकार विरुद्ध आंदोलन देखील सुरू आहे.

दोन आठवड्यांपूर्वी नाशिकमध्ये सुरू असलेल्या आदिवासी उमेदवारांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी आदिवासी विकास विभागाला घेराव घालण्यात आला होता. माजी आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आदिवासी नेत्यांनी धरणे आंदोलन केले.

त्या आंदोलनात हस्तक्षेप करीत राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी मुख्यमंत्री यांची आंदोलकांची चर्चा घडवून आणली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका आठवड्यात या प्रश्नावर कृती केली जाईल. ४ सप्टेंबरला होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत हस्तक्षेप करून आदिवासी उमेदवारांना नियुक्ती देण्याचे आश्वासन दिले होते.

या आश्वासनावर काहीही ठोस कार्यवाही होऊ शकलेली नाही. ४ सप्टेंबर तसेच ११ सप्टेंबरला देखील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र त्यात काहीही कामकाज झाले नाही. त्यात काहीही निर्णय झाला नाही. त्यामुळे आदिवासी उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे.

नाशिक येथे आंदोलन मागे घेताना राज्य शासनाला माजी आमदार गावीत त्यांनी इशारा दिला होता. उद्यापासून पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा निर्णय आदिवासी उमेदवारांच्या संघर्ष समितीने घेतला आहे. माजी आमदार गावित यांच्या उपस्थितीत आता थेट राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ गावित यांच्या मतदारसंघातच आंदोलन होईल.

उद्या नंदुरबार येथे आदिवासी बांधवांचा मेळावा होऊन या प्रश्नावर जनजागृती करण्यात येणार आहे. त्यानंतर धुळे तसेच लगतच्या आदिवासी जिल्ह्यांमध्ये मेळावे होतील. राज्य शासनाने आश्वासन दिल्यानंतर याबाबत प्रशासनाकडून गंभीर कार्यवाही अपेक्षित होती.

प्रशासन उदासीन असल्याचे चित्र आहे. आदिवासी उमेदवारांच्या प्रश्नावर केवळ आश्वासने दिली जात आहेत. कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही न झाल्याने उद्यापासून जनजागृती सुरू होत आहे. आता या आंदोलनाला माजी आमदार गावित विरुद्ध आदिवासी विकास मंत्री गावित असे स्वरूप येणार आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्याने आदिवासी पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत आहेत. आंदोलन करूनही राज्य शासन उदासीन असल्याने आणि विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असल्याने त्याचा काय राजकीय परिणाम होतो याचीही उत्सुकता आहे.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT