Eknath Shinde with Darade Family Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde : सर्वोच्च निकालाची धावपळ... मुख्यमंत्री शिंदे पोहोचले ठाकरे गटाच्या आमदाराकडे!

Sampat Devgire

Eknath Shinde News : स्वतःसह सोळा आमदारांचे आणि राज्य सरकारचे भवितव्य आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे पणाला लागले होते. सगळेच अस्वस्थ व व्यस्त कार्यक्रम होते. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र मुंबई सोडून ठाकरे गटाचे आमदार किशोर दराडे यांच्या मुलाच्या विवाह समारंभाला पोहोचले. त्यामुळे त्यांचा हा दौरा चर्चेचा विषय ठरला. (CM Eknath Shinde visits Thackeray Group`s Programme)

नाशिकला (Nashik) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) आमदार किशोर दराडे यांच्या मुलाच्या विवाह समारंभास उपस्थित राहिले. त्यामुळे त्यांचा हा दौरा चर्चेचा विषय ठरला.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून आज सत्याचा विजय झाला आहे. या निकालातून मिळालेला विजय सर्वसामान्यांच्या मनातला विजय आहे.

श्री. शिंदे निर्धास्त होते. ते म्हणाले, आमच्या सरकारवर घटनाबाह्य सरकार असा आरोप करणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठी चपराक मिळाली आहे. आज आमच्या सरकारवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांच्या मनातला निर्णय कोर्टाने दिला असे सांगतिले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आज राज्य सरकारचे सर्वच मंत्री, आमदार तणावात होते. त्यामुळे सगळ्यांना मुंबईत थांबण्याच्या सुचना देखील देण्यात आल्या होत्या. असा व्यस्त दिवस असतानाही श्री. शिंदे खास विमानाने मुंबईहून नाशिकला आले. ठाकरे गटाचे आमदार दराडे यांच्या कार्यक्रमाला हजर राहिले. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT