Chief Minister Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

पांडूरंगाची पूजा `एकनाथ`च करणार, पण परतल्यावर सरकार राहील का?

आषाढी एकादशीला पंडरपूरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शासकीय पूजा करणार

Sampat Devgire

नाशिक : आषाढी एकादशीला पंढरपूरला विठ्ठलाची पूजा कोण करणार? ही अनिश्चिंतता दूर झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच विठ्ठलाची पूजा करणार आहेत. मात्र पूजा करून परतल्यावर त्यांचे सरकार (State Government) राहील का?. ही राजकीय अनिश्चितता मात्र कायम आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) सुनावनीत ते ठरेल, त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (Wull Eknath Shinde government exist after Vitthal mahapuja)

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले, पांडूरंग देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहे, असे मी म्हणालो होतो. ते आता खरे ठरले आहे. फडणवीसांवर पांडूरंग का नाराज आहे, हा संशोधनाचा विषय आहे. पांडूरंगांची पूजा कोण करणार हे आता स्पष्ट झाले आहे. मात्र पूजा करून परतल्यावर त्यांचे सरकार राहील का? हा एक प्रश्न शिल्लक आहे.

ते म्हणाले, शिवसेनेने पंधरा बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याचा अर्ज सर्वोच्च न्यायालयात प्रलंबीत आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारबाबत वेगळे विधान केले आहे. त्यामुळे सरकार नेमके कोणाचे, असा प्रश्न जनतेपुढे आहे.

याबाबत गोव्यात असलेल्या एकनाथ शिंदे समर्थक आमदारांत देखील त्याबाबत चर्चा आहे. त्यामुळे आमदार अपात्र ठरविण्याबाबत प्रश्न शिल्लक आहे. श्री. शिंदे यांना येत्या सोमवारी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन होत आहे. यावेळी एकनाथ शिंदे सरकारला बहुमत सिद्ध करायचे आहे. यावेळी अधिकृत व्हीप कोणाचा, हा प्रश्न निर्माण होईल. शिवसेनेचे बंडखोर आमदार म्हणतात, आम्ही पक्षातच आहोत. मात्र सोमवारी कोणाला मतदान करावे याचा व्हीप शिवसेनेचे सुनील प्रभू काढतील. त्याचवेळी बंडखोर गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्याकडूनही वेगळा व्हीप निघेल. यामध्ये अधिकृत न्हीप कोणाचा हा देखील गोंधळ निर्माण होईल.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT