Aman Mittal News
Aman Mittal News  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Aman Mittal News : जिल्ह्याधिकाऱ्यांच्या भेटीनं आदिवासी पाडा उजळून निघाला..

कैलास शिंदे - Sarkarnama

Jalgaon News : आदिवासी पाड्यावर यंदा वर्षांची सुरवात आनंदाने झाली. तिळगुळ,चिक्की ,बिस्किट,लहान मुलांचे कपडे, स्वेटर पायमोजे, साड्या भेट मिळाल्याने आदिवाशी पाड्यावरील जनता भारावून गेली.

जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी मकर संक्रात आदिवासी पाड्यावर आदिवासी सोबत साजरी केली. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी संक्रांती निमित्ताने लंगडा आंबा, जामन्या,गाडर्या भागात तिळगुळ, चिक्की ,बिस्किट ,लहान मुलांचे कपडे स्वेटर आदी वस्तू भेट दिल्या.

यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांकडून परिसराची पाहणी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी वनविभागातील वृक्षारोपणचा आनंद घेतला. लंगडा आंबा परिसरातील आदिवासी बांधवासोबत चर्चा करून समस्या जाणून घेतल्या.

आजवरच्या इतिहासात प्रथमच सणाच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांकडून या परिसरात प्रत्यक्ष येऊन समस्येवर चर्चा,आपुलकीने विचारपूस तसेच संक्रांतीनिमित्त तोंड गोड करून कपडे वितरणाने आदिवासी बांधव भारावून गेले आहेत. सुमारे 200 महिला, 350 लहान मुले व वृद्ध यांना याचा लाभ मिळाला.

नूतन जिल्हाधिकारी अमन मित्तल हे 2015 बॅचचे जिल्हाधिकारी असून त्यांची आजवरची कारकीर्द उत्तम राहिली आहे. मित्तल यांनी नाशिक, कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, लातूर मनपा आयुक्त म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. महापूर काळात आणि कोरोना काळात त्यांनी आघाडीवर राहून काम केले होते. जळगाव जिल्ह्याला सलग दुसर्‍यांदा तरुण, तडफदार अधिकारी लाभले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT