Com. Dange`s Fortress at Karanjgaon (Nashik)
Com. Dange`s Fortress at Karanjgaon (Nashik) Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shreepad Dange News; कॉम्रेड डांगेंची गढी कुठे आहे? त्या मालमत्तेचा वाद काय आहे?

Sampat Devgire

आनंद बोरा

महसूल विभागाच्या सरकारी यंत्रणेने हा वाद शीतपेटीत ठेवला आहे. ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे स्थान असलेल्या करंजगाव (ता. निफाड) येथील सरकारवाडाशी (गढी) निगडीत असलेल्या सरदार सटवाजी राजोळे यांचे वंशज भाऊसाहेब राजोळे आणि डांगे यांची नात संध्या अडवाणी यांनी मालमत्तेसंबंधीचे दिलेले अर्ज लालफितीच्या कारभारात फाईल करण्यात आले आहेत.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त डांगे कुटुंबातील वारसांचा सन्मान नाशिक जिल्हा परिषदेत २९ जुलै २०२२ ला झाला. त्याबद्दल संध्या अडवाणी यांनी प्रशासन आणि सरकारचे आभार मानले. या कार्यक्रमानंतर त्या करंजगाव ग्रामपंचायतीमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी आपल्या करंजगावमधील मालमत्तेवर दुसऱ्या व्यक्तीचे नाव लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग करुन निफाडच्या भूमीअभिलेख कार्यालयातर्फे वारसाची नोंद केली आहे, असा तक्रार अर्ज त्यांनी ३० जुलै २०२२ ला नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला.

अर्जाची प्रत मुख्यमंत्री, महसूलमंत्री, पालकमंत्री, ग्रामपंचायतला पाठवून त्यासोबत फेरफारीची नोंद जोडली. भूमीअभिलेख अपील निर्णय, निफाड भूमीअभिलेखचे उपअधीक्षक यांच्याकडील फेरचौकशीच्या निर्णयाप्रमणे अपील मान्य करुन वारस नोंद केल्याने प्रशासनाची दिशाभूल झाल्याचे संध्या अडवाणी यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

ऑगस्टमध्ये राजोळेंचा अर्ज

ऐतिहासिक सरकारवाडा तथा सरदार राजोळे गढीचे संवर्धनासाठी करंजगाव ग्रामपंचायतीच्या ताब्यात देऊन स्वातंत्र्यवीरांचे स्मारक उभारण्याची मागणी करणारा अर्ज सरदार सटवाजी राजोळे यांचे दहावे वंशज भाऊसाहेब राजोळे यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये जिल्हा प्रशासनाला दिला. ऐतिहासिक वास्तूवर नमूद केलेली नावे वगळून संबंधितांविरुद्ध देशद्रोही फौजदारी गुन्हा दाखल करावा. त्यासंबंधीचे आदेश विशेष ग्रामसभा घेऊन द्यावेत, अशी मागणी श्री. राजोळे यांनी केली आहे.

ब्रिटीश्‍यांविरुद्ध लढलेल्या सरदार माधवराव राजोळे यांच्या सरकारवाड्यातील मानकरी आणि स्वातंत्र्यवीर घराणे राजोळे, गायकवाड, पवार, शिंदे, हिंगणे, पळशीकर, जाधव, भगुरे, पगार, वल्टे, टिळे, भागवत, ढमडेरे, डांगे, डांगळे, निरभवणे, उन्हवणे यांची नोंद करंजगाव ग्रामपंचायत दप्तरी व्हावी असेही अर्जात नमूद करण्यात आले आहे.

महसूल-ग्रामविकासची टोलवा-टोलवी

कॉम्रेड डांगेंच्या नातीसह राजोळेंचे अर्ज महसूलकडे दाखल झाले. त्यानुसार महसूलकडून ग्रामविकासला सूचना देण्यात आल्या. मात्र या दोन्ही विभागाकडून टोलवा-टोलवीचे सत्र अवलंबले गेले. अर्ज करुन सात महिने लोटले, तरीही त्याबद्दल नेमकी काय कार्यवाही झाली याचे उत्तर देण्याची तसदी यंत्रणेने घेतली नाही. उलटपक्षी मालमत्तेविषयीचा हा विषय महसूलशी निगडीत असल्याचे सांगून ग्रामविकास विभागाने हात वर केले आहेत.

ऐतिहासिक संदर्भ

- १७४५ मध्ये सरकारवाड्याची दोन एकरात उभारणी

- १७५३-५४ मध्ये सरदार मल्हारराव होळकर यांनी चांदवड परगाण्यातील १४० गावे आणि संगमनेर परगाण्यातील ४० गावांची सैन्यभरती सरकारवाड्यातून केली

- अहिल्याबाई होळकर, माधवराव पेशवे, रघुनाथराव पेशवे यांनी सरकारवाड्याला भेट दिल्याची दप्तरी नोंद

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT