Jalgaon News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Politics : माय रस्ता करून दे... व! आजींची आयुक्तांकडे मागणी; विद्या गायकवाड ॲक्शन मोडवर

कैलास शिंदे

Jalgaon Municipal News : माय, तु माह्या मुलीसारखी हाय, माह्या रस्ता करू दे...व! अशी प्रेमाने विनंती करीत एका आजीने जळगाव (Jalgaon) महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना आपल्या घराजवळील रस्ता दाखविला. गायकवाड सोपानदेव नगरमध्ये पाहणी करीत होत्या. अविश्‍वास ठरावाच्या स्थगितींनंतर बुधवारी त्यांनी रस्ते आणि गटारांच्या कामांची पाहणी केली. गायकवाड यांच्यावर महापालिकेतील नगरसेवकांनी अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला होता. मात्र, मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan)गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या मध्यस्थीने मंगळवारी झालेल्या महासभेत तो मागे घेण्यात आला.

त्यांनंतर आज (ता.२) दुसऱ्या महापालिका आयुक्त ॲक्शनमोडवर आल्या. सकाळी दहा वाजता त्या महापालिकेतील आपल्या कार्यालयात दाखल झाल्या. प्रशासकीय मान्यतेसाठी असलेल्या काही प्रस्तावार स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर शहरातील कामाच्या निवीदांना मंजूरी दिली. प्रभागातील पाहणीसाठी अधिकाऱ्यांसोबत आयुक्त रवाना झाल्या. शहरातील सोपानदेव नगरभागात जाऊन त्यांनी कामाची पाहणी केली.

रामेश्‍वर कॉलनीतील काही रस्त्याची कामे झाली आहेत. त्याची बिले मंजुरीसाठी आलेली आहेत. त्या भागातील रस्ते व इतर कामाचीही त्यांनी आढावा घेतला. पिंप्राळा भागातील शिंदे नगर येथील नाल्याच्या समस्येची पाहणी करून कामाबाबत सूचना दिल्या. त्यांनी काही कामे तातडीने करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे उपस्थित होते.

आपल्या पाहणी दौऱ्यात आयुक्तांनी नागरिकांशीही चर्चा केली. महिलांशी संवाद साधतांना एका आजीने प्रेमाने त्यांचा हात धरून आपल्या घराकडे घेवून गेल्या. त्या ठिकाणचा रस्ता दाखवून त्या म्हणाल्या माय, माह्या रस्ता करून दे..व! यावेळी त्यांच्या समवेत प्रभागातील नगरसेवक विरेन खडके होते. जनतेच्या प्रेमाने आयुक्तही भारावल्या व रस्ता लवकरात लवकर करून देईन, अशी ग्वाही त्यांनी आजींना दिली.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT