Communist Party of India Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Communist Party of India : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष राज्यात वाढवतोय ताकद; एवढ्या जागांवर आहे डोळा

Pradeep Pendhare

Ahmednagar News : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांसह घटक पक्षांनी चाचपणीत आघाडी घेतलीय.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने देखील राज्यात विधानसभा निवडणुकीतील अनुकूल जागांचा अंदाज घेतला असून, पक्षाने राज्यातील 12 जागांवर दावा केला आहे. यात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदार संघाच्या जागेचा समावेश आहे.

महाविकास आघाडीने राज्यातील 12 जागा सोडाव्यात, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने 'मविआ'कडे केली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जागांबाबत आक्रमक भूमिका घेतल्याने मविआ जागा वाटपात छोटे-छोटे मित्र पक्षांचा विचार करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघाची जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडण्यासाठी 'मविआ'चे तथा काँग्रेसचे (Congress) नेते बाळासाहेब थोरात यांची शिष्टमंडळ भेट घेतली. या भेटीत जागा वाटपावर आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर बरीच चर्चा झाली.

'मविआ'मध्ये जागा वाटपावर चर्चा सुरू झाल्या आहे. मुंबईतील जागा वाटपाचा तिढा जवळजवळ 99 टक्के सुटला आहे. आता राज्यातील जागा वाटपावर निर्णय आणि चर्चा होत आहे. यातच 'मविआ'मध्ये छोटे मित्र पक्षांचा ग्रामीण भागात दबदबा आहे. त्यानुसार चाचपणी झाली आहे. या जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा छोटे पक्ष करत आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष राज्यात शेतकरी (Farmer), शेतमजूर, कामगार, कर्मचारी, श्रमिकांचे प्रतिनिधीत्व करतो. या पक्षाने जागा वाटप कार्यक्रमात मविआने समावून घेण्याची अपेक्षा केली आहे. त्यानुसार राज्यात 12 जागांची मागणी केली आहे.

लोकसभा निवडणुकीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने 'मविआ'ला राज्यात चांगली मदत केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या 'मविआ'कडून अपेक्षा वाढल्या आहेत. तसेच किमान समान कार्यक्रम आणि निवडणूक जाहीरनामा बनवण्याच्या प्रक्रियेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आग्रहाचा प्राधान्याने विचारात घेतले जातील, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली.

या जागांवर आहे डोळा

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने डहाणू (पालघर), कळवण, नाशिक पश्चिम, दिंडोरी व इगतपुरी (जिल्हा नाशिक), सोलापूर (मध्य), अकोले (अहमदनगर), किनवट (नांदेड), पाथरी (परभणी), माजलगांव (बीड), विक्रमगड (पालघर), शहापूर (ठाणे) इथल्या जागेवर दावा केला आहे. मविआ तथा काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळामध्ये पक्षाचे राज्य सचिव उदय नारकर, माजी आमदार व ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम मास्तर, कामगार नेते डॉ. डी. एल. कऱ्हाड आणि डॉ. अजित नवले यांचा समावेश होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT