Eknath Khadse
Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

काँग्रेसचा आरोप, जळगाव जिल्हा बँकेत एकनाथ खडसेंची ‘मोनोपॉली’

Sampat Devgire

जळगाव : काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी (Shirish Choudhary) व जिल्‍हाध्‍यक्ष प्रदीप पवार (Pradeep Pawar) यांनी काँग्रेसची उमेदवारी शैलजा निकम (Shailja Nikam) व विनोद पाटील (Vinod Patil) यांना दिली. मुळात काँग्रेसचे उमेदवारही एकनाथ खडसे (Eknath Khadse) ठरवितात. एवढी ‘मोनोपॉली’ जिल्‍हा बँकेत सुरू आहे. आपल्‍या मर्जीप्रमाणे कसे होईल, यासाठी खडसे यांचा प्रयत्‍न असल्‍याने काँग्रेसचे उमेदवार त्‍यांनी ठरविल्‍याचा आरोप डी. जी. पाटील यांनी केला.

जळगाव जिल्‍‍हा बँक निवडणुकीसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ व निवडून येणारे उमेदवार होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी एकनाथ खडसे यांचे ऐकून अन्य उमेदवार दिले. त्यामुळे नाराजी व्यक्त करून भाजप, राष्‍ट्रवादी व काँग्रेसमधून डावललेले कार्यकर्ते शेतकरी विकास पॅनलच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविणार आहे, असे काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव डी. जी. पाटील यांनी सांगितले.

जिल्‍हा परिषदेतील शिक्षण व आरोग्‍य समिती सभापती दालनात पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेला भाजपचे कार्यकर्ते तथा शिक्षण सभापती रवींद्र पाटील, राष्‍ट्रवादीचे जिल्‍हा समन्‍वयक विकास पवार, विकास वाघ आदी उपस्थित होते. या तिन्ही पदाधिकाऱ्यांनी जिल्‍हा बँक निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलखाली उमेदवारी करणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले असून, यासाठी मोटारसायकल चिन्‍ह दिले आहे.

प्रमुखांना डावलले

जिल्‍हा बँकेच्या निवडणुकीत राष्‍ट्रवादी, काँग्रेसने प्रमुख उमेदवारांना उमेदवारी न देता जे पक्षातही नव्‍हते, अशांना उमेदवारी जाहीर केली, तर भाजपने सर्व उमेदवारांना माघार घ्यायला सांगितली. तुल्‍यबळ उमेदवार असताना, काँग्रेसशी काहीही संबंध नसताना शैलजा निकम यांना उमेदवारी दिली. अर्थात सामान्‍य कार्यकर्त्यांना स्‍थान दिले जात नाही. मंत्री, आमदारांना अनेक कामे असताना, केवळ खुर्ची हवी, म्‍हणून जिल्‍हा बँकेतही उमेदवारी करीत आहेत. यामुळे नाराज असलेल्‍या उमेदवारांनी मिळून शेतकरी विकास पॅनल तयार केल्‍याचे या वेळी स्‍पष्‍ट केले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT